8.41 लाखापासून किंमत सुरु ः 14 प्रकारांमध्ये, 6 रंगांमध्ये येणार गाडी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मारुती सुझुकीने भारतात 2023 अर्टिगा सादर केली आहे. देशातील सर्वात मोठय़ा कार कंपनीने फिलीपिन्स इंटरनॅशनल मोटर शोमध्ये आपल्या नेक्स्ट जनरेशन कारचे अनावरण केले आहे. यामध्ये 7-सीटर मल्टीयुटिलिटी व्हेईकल (एमयूव्ही) ची किंमत 8.41 लाख रुपये (एक्स-शोरूम) राहणार असल्याची माहिती आहे.
सदरची गाडी ही 14 वेगवेगळय़ा प्रकारांमध्ये आणि 6 रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग सिस्टिम मिळणार असल्याची माहिती आहे.
इन्फोटेनमेंन्ट सिस्टम
अर्टिगामध्ये 17.78 स्मार्टप्ले प्रो डिस्प्ले आणि सुझुकी कनेक्ट कार तंत्रज्ञान मिळेल. 1462 सीसी क्षमतेचे इंजिन आणि बीएस6 उत्सर्जन प्रकारातील कारमध्ये 45 लिटरची इंधन टाकी आहे. समोर डिस्कसह 360 डिग्री कॅमेरा आणि मागील बाजूस ड्रम ब्रेकदेखील उपलब्ध होणार आहे. कारमध्ये पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड एटी देखील आहे. दुसऱया रांगेत छतावर बसवलेले एसी, एअर कूल्ड ट्विन कप होल्डर, मेटॅलिक टीक-वूडन फिनिशसह डय़ुअल टोन इंटीरियर आणि स्कल्प्टेड डॅशबोर्ड देखील यात मिळणार आहे.
एअरबॅगची सुरक्षा
ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून मारुतीने पुढील रांगेत चार एअरबॅग्ज दिल्या आहेत. आरामासाठी, तुम्हाला दुसऱया आणि तिसऱया रांगेतील रेक्लाइन सीटवर स्मार्ट फ्लेक्सी सीट मिळेल.
2 भिन्न रंगांमध्ये चाके
अर्टिगामध्ये एक नवीन डायनॅमिक क्रोम विंग प्रंट ग्रिल आणि मागच्या दारावर क्रोम इन्सर्ट मिळेल. अलॉय व्हील्स 2 वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहेत.