किमत 3.99 लाख रुपये : 22 वर्षांमध्ये प्रत्येक तासाला 100 आल्टोची विक्री
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
मारुती सुझुकी कंपनीने आपले नवीन आल्टो के 10 हे मॉडेल सादर केले आहे. सदरची कार ही सॉलिड व्हाइट, सिल्की सिल्वर, ग्रेनाइट ग्रे, सिझलिंग रेड, स्पीडी ब्लू आणि अर्थ गोल्ड कलर आदी रंगामध्ये उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या कारची किमत ही 3.99 लाख ते 5.83 लाख रुपये(एक्स शोरुम) किमत राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
नवी आल्टो 24.90 किमी प्रति लिटर इतके मायलेज देणारी असून याचे इंजिन हे 998 सीसीचे राहणार आहे. आल्टो ही साधारणपणे वर्ष 2000 मध्ये बाजारात दाखल झाली. कंपनीच्या माहितीनुसार 2022 पर्यंत या मॉडेलची विक्री ही 43 लाख झाल्याची नोंद आहे. म्हणजे प्रत्येक तासाला 100 कारची विक्री झाली आहे. दीर्घकालावधीपासून देशातील सर्वाधिक विक्री होणारी ही कार बनली आहे.
जाणून घेऊया आल्टो के 10 बाबत….
आल्टो के 10 चे बुकिंग हे 11 हजार रुपयापासून करण्याची सुविधा आहे. याचे एक्सटीरियर आणि इंटीरियर दोन्ही नवीन फिचर्ससोबत अपडेट करण्यात आले आहे. हार्टेक्ट प्लॅटफॉर्ममध्ये कार तयार करण्यात आली आहे. हा प्लॅटफॉर्म मारुती सुझुकी एस, प्रेसो, सेलेरियो, बलेनो आणि अर्टिगा याकरीता वापरला होता.
अधिकची फिचर्स मिळणार
- डबल एअरबॅग, पार्किंग असिस्टंस सिस्टम
- आटो डोर लॉक व हाय स्पीड अलर्टसारखी फिचर्स
- यासह अन्य अत्याधुनिक फिचर्सची सुविधा मिळणार