वृत्तसंस्था/ मुंबई
मारुती सुझुकीने मोक्का कॅफे एडिशनअंतर्गत नवी स्विफ्ट कार नुकतीच लाँच केली आहे. सदर गाडीची किंमत 15 लाखापेक्षा जास्त असणार असल्याची माहिती आहे. बँकॉक इंटरनॅशनल मोटर शोमध्ये सदरची गाडी लाँच केली असून स्पोर्टी डिझाइनसह 10 इंचाची इन्फोन्मेंट सिस्टम यात दिली आहे. ड्युअल टोन रंगात ही कार दाखल करण्यात आली असून के 12 एम इंजिनसह 1.5 लिटरची ई-20 इंधन टाकी दिली आहे.
10 इंचाची टचस्क्रीन युनिटसह इन्फोन्मेंट सिस्टम असून स्टीअरिंग-माउंटेड ऑडीयो कंट्रोलची सुविधा आहे. तर कारची सीट ही दुहेरी रंगातील असून अंतर्गत रचनाही सुरेख अशीच आहे. भारतीय बाजारात स्विफ्ट गाडीची लोकप्रियता कैकपटीने अधिक आहे. जिची सुरुवातीच्या लाँचिंगवेळी किंमत 5.99 लाख रुपये इतकी होती. भारतात आज स्विफ्टच्या 11 व्हेरियंटसच्या कार्स आहेत.