Tarun Bharat

‘मारुती’चे 20 लाख वाहन उत्पादनाचे ध्येय निश्चित

Advertisements

कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांची माहिती

नवी दिल्ली

 देशातील सर्वात मोठी कार उत्पादन करणारी कंपनी मारुती सुझुकी इंडिया यांनी सेमीकंडक्टरच्या पुरवठय़ात सुरळीतपणा आल्यामुळे चालू आर्थिक वर्षात जवळपास 20 लाख युनिट्सचे उत्पादन घेणार असल्याचे ध्येय निश्चित केले असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी दिली आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या वार्षिक अहवाल सादरीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन एसयूव्ही मॉडेल ग्रँड विटारा ही विशेष भूमिका यामध्ये निभावणार असल्याचेही भार्गव यांनी स्पष्ट केले आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये मारुतीचे उत्पादन हे 13.4 टक्क्यांनी वाढून 16.52 लाख इतके राहिले आहे. एप्रिल ते जून 2021 मध्ये महामारीच्या दरम्यान उत्पादनाच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे.

सेमीकंडक्टरची उपलब्धता सर्वाधिक राहील

चालू आर्थिक वर्षात 2022-23 साठी अभ्यासकांच्या मतानुसार सेमीकंडक्टरची निर्मिती मुबलक होणार असून याचा थेट फायदा उत्पादनावर होणार असल्याचे भार्गव यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

Related Stories

भारत गॅसची बुकिंगसाठी व्हॉट्सअप सुविधा

Patil_p

आनंद राठी वेल्थचा आयपीओ लवकरच

Patil_p

2020 मध्ये भारतीय प्रवाशांनी 6.10 कोटी मायदेशी पाठविले

Patil_p

एलआयसीच्या 2 योजनांच्या पेन्शनमध्ये वृद्धी

Patil_p

प्राप्तिकर विभागाकडून 1.54 लाख कोटीपेक्षा अधिकचा परतावा सादर

Amit Kulkarni

इपीएफओत डिसेंबरमध्ये जोडले गेले 14 लाख सदस्य

Patil_p
error: Content is protected !!