प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळीचे औचित्य साधून बेळगावमधील सर्व ढोलताशा पथकांनी एकत्र येऊन शनिवारी शिवाजी उद्यान परिसरात महावादन केले. एरवी विविध मंडळांसाठी ढोलताशा वाजविणारे वादक शनिवारी मात्र एकाच ठिकाणी एकाच ठेक्मयात वादन करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे बेळगावकरांसाठी हा वेगळा सोहळा ठरला. नामवंत ढोलताशा पथकांनी शिवाजी उद्यान परिसरात सामूहिक वादन केले. मोरया, वज्रनाद, आरंभ, धाडस, शिवगर्जना, बाप्पा, गजराज, आराध्य, एकदंत, रूद्रसाल व रावण या पथकांनी यात सहभाग घेतला. येथे प्रथमच अशा प्रकारे सामूहिक वादनाचा प्रयत्न झाला. नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती.