Tarun Bharat

विश्रांतवाडी आरटीओ कार्यालयाच्या आवारात भीषण आग; 10 वाहने जळून खाक

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

पुण्याच्या विश्रांतवाडी येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आरटीओने जप्त केलेली दहा मोठी वाहने जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  

विश्रांतवाडी फुलेनगर येथील आरटीओ कार्यालयाच्या आवारात आज दुपारी अचानक आग लागली. काही क्षणात आगीने उग्र रुप धारण केले. रविवार आणि मकरसंक्रांतीची सुट्टी असल्याने कार्यालय बंद होते. त्यामुळे ही बाब स्थानिकांच्या लवकर निदर्शनास आली नाही. परिसरात धुराचे लोट पसरल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन दलाला यासंदर्भात माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत आरटीओने जप्त केलेली 10 वाहने आगीत जळून खाक झाली. यामध्ये 4 लक्झरी बस, 4 कार, 1 टेम्पो आणि 1 डंपर यांचा समावेश आहे.

Related Stories

शरद पवार विरोधकांचा चेहरा झाले, तर आनंद -नितिश कुमार

Archana Banage

किशोर आवारे यांची भरदुपारी हत्या

datta jadhav

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही सज्ज

Archana Banage

सत्ताधाऱ्यांकडून अनेक यंत्रणाचा वापर पण जनतेनेच योग्य उत्तर दिले- अजित पवार

Abhijeet Khandekar

पुलंच्या स्मृतिदिनानिमित्त रंगली ‘ऑनलाईन’ मैफील

datta jadhav

‘भीमथडी’त भरडधान्याचे प्रकार पाहण्याची सुवर्णसंधी

datta jadhav
error: Content is protected !!