Tarun Bharat

इराणमध्ये बलात्कारामुळे प्रचंड हिंसाचार

Advertisements

वृत्तसंस्था/ तेहरान

एका शिया पंथीय पोलीस कमांडरने सुन्नी पंथीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आल्याने इराणमध्ये प्रक्षोभ उसळला आहे. ही अल्पवयीन मुलगी बलूच जमातीची असून इराणमधील या जमातीचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. अनेक शहरांमध्ये जाळपोळीच्या घटना मोठय़ा प्रमाणावर घडल्या असून पोलीस गोळीबारात 36 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

इराणचे प्रमुख सुन्नी धर्मगुरु अब्दुल हमीद यांनी बलात्कार झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. ही घटना इराणच्या अग्नेय भागातील सिस्टान आणि बलुचिस्तान प्रांतामध्ये काही दिवसांपूर्वी घडली असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील आरोपीचे नाव इब्राहिम खुचाकजाई असे आहे. निदर्शने सुरू असताना अनेक ठिकाणी पोलीस आणि निदर्शक यांच्यात मारामाऱया झाल्याचे वृत्त आहे.

नेमकी घटना काय?

या प्रकरणातील आरोपी कर्नल इब्राहिम खुचाकजाई यांच्यावर हत्या प्रकरणाचा शोध लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पीडित युवती हत्या झालेल्या महिलेच्या शेजाऱयाची मुलगी आहे. चौकशी अधिकाऱयाने या मुलीलाही चौकशीसाठी कार्यालयात आणून तेथे तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

अपहरणाचाही गुन्हा

बलात्काराचे प्रकरण लपविण्यासाठी आरोपीच्या हाताखाली काम करणाऱया सुरक्षा दलांनी पीडित मुलीच्या काही नातेवाईकांचे अपहरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पिडीतेला काही झाले नसल्याची कबुली या अपहरण केलेल्या नातेवाईकांकडून घेण्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी केल्याचे दिसून आले.

इराणमधील बलुच हे कोण?

पाकिस्तानातील बलुचिस्तान हा इराण आणि पाकिस्तान यांमध्ये विभागला गेला आहे. बलुचिस्तानचा जो भाग इराणमध्ये आहे त्याला सिस्तान प्रांत असे म्हणतात. या प्रांतात इराणमधील बहुतेक बलुच नागरिक राहतात. त्यांची लोकसंख्या सुमारे 20 लाख आहे. इराणी लोकांचा धर्म इस्लाम असला तरी त्यांच्यातील विविध जाती-जमातींमध्ये परस्पर वैराची भावना असते. त्यातून अशी गुन्हेगारी घडते, असे प्रशासनाने केलेल्या वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

आशियाई विकास बँकेची भारताला 16 हजार 500 कोटींची मदत

prashant_c

अमेरिकेत स्थिती बिघडली

Patil_p

भारतातील कोरोना चाचण्या अविश्वासार्ह

datta jadhav

सर्वात धनाढ्याचा पहिला अंतराळ प्रवास यशस्वी

Patil_p

उष्णतेपासून वाचण्यासाठी स्पेनच्या पंतप्रधानांचे अजब आवाहन

Patil_p

भारत आणि ब्रिटनच्या सोलर ग्रीन ग्रिड्स पुढाकाराला अमेरिकेचा पाठींबा

Archana Banage
error: Content is protected !!