प्रतिनिधी / नृसिंहवाडी
येथे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर व मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनी सोमवारी पहाटे श्रीदत्त दर्शन घेतले. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळण्यासाठी श्रीदत्त चरणी प्रार्थना केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोमवारी पहाटे 4ः45 वाजता सचिन तेंडुलकर व अर्जुन तेंडुलकर पिता-पुत्रांनी येथील कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या व श्री दत्त महाराजांची राजधानी असलेल्या दत्त मंदिरास दर्शनासाठी भेट दिली व दत्त चरणाचे रांगेतून दर्शन घेतले. दरम्यान, त्यांचा मुलगा अर्जुन यांची गोव्यामध्ये असलेल्या क्रिकेटसाठी दत्ताचे आशीर्वाद मिळावेत. तसेच भारतीय संघात निवड व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली. यावेळी सौरभ भोळे उपस्थित होते. नवल खोंबारे यांनी श्रीदत्त चरणी प्रार्थना करून श्रीफळ प्रसाद दिला.