सांखळी/प्रतिनिधी
राज्यात सहा जून रोजी शाळा सुरु होत असल्याने सांखळी बाजारात विध्यार्थी वर्गाला लागणारे साहित्य उपलब्ध झाले असून शाळेत विध्यार्थी वर्गाला लागणाऱया समनाने दुकाने सजली आहे. आज रविवारी शाळकरी मुलं समान खरेदी साठी बरीच गर्दी करणार असल्याचे दुकान मालक माल विक्रीसाठी सज्ज झाले आहेत.
सांखळी मतदारसंघात आमोणा,न्हावेली, कुडणे, हरवळे, सुर्ल,वेळगे, पाळी, आणि सांखळी शहर परिसरात, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयात इत्यादी ठिकाणी हजारो विद्यार्थी विद्या ग्रहण करतात त्या विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य सांखळीबाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे अशी माहिती दुकान मालकांनी या विषयीं बोलताना दिली.
(गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची आवश्यकता सांखळी मतदारसंघातील ज्या दानशूराना गरीब मुलांना साहित्य देण्याची इच्छा असल्यास आमच्या बायेकरन्य?ज शी संपर्क साधावा आपली लहानशी मदत सांखळी मतदारसंघातिल गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आदर ठरू शकते या साठी 9607023015 वर संपर्क साधावा.)