Tarun Bharat

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात मटका जोमात

प्रतिनिधी/ कोयनानगर

कोयनानगरमध्ये सोमवार दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून एका वॉट्सअप ग्रुपवर कल्याण मटक्याची पावती पाठवली जात आहे. राजरोसपणे चाललेल्या मटक्याच्या धंद्यांची ही पोच पावतीच असल्याने कोयना परिसरातील खळबळ उडाली आहे. आतातरी पोलीस यंत्रणा जागी होणार का ? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात असून पालकमंत्रांच्या तालुक्यातच अवैध धंद्याना बळ मिळत असल्याचे उघड झाल्याने पालकमंत्री अवैधधंद्ये वाल्यांच्या मुसक्या आवळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  सायंकाळी पाच वाजता कल्याण मटक्याचा आकडा केला जातो असे असल्याने सोमवारी सायंकाळी चार वाजल्यापासूनच कोयनानगरमधील एका वॉट्सअप ग्रुपवर कल्याण मटक्याची पावती व्हायरल केली. हा आकडा फिक्स असून सर्वांनी तो लावा असे मेसेज व्हायरल झाल्याने कोयना परिसरातील एकच खळबळ उडाली आहे. मटक्यासह कोयना परिसरातील अवैध धंद्याना कोणाचे अभय आहे, असा प्रश्न समोर येत आहे. राजरोसपणे सोशल मीडियावर अशा पद्धतीने मटक्याच्या पावत्या पाठवल्या जात असतील तर पोलीस यंत्रणा नेमकी करतेय काय? व या अवैधधंद्ये चालक जोमात व जनता कोमात अशी स्थिती पाहिला मिळत आहे. अवैधधंद्ये चालकांवर कोणाचा धाक राहिला नसून पालकमंत्र्यांच्या तालुक्यातच अवैध धंद्याना बळ मिळतेय अशा संतप्त प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. 

  यापूर्वी 21 नोव्हेंबर 2022रोजी मटक्याच्या पैशाच्या देवाण-घेवानीवरून कोयनेत दोन मटका चालकांच्या गटात मारामारी झाली होती. या वेळी आप आपसातील मारामारी झाल्याचे दाखवून पोलिसांनी त्यांची पाठ राखण केली होती व मारामारचे कलम लावून केसेस टाकल्या होत्या. त्या केसेस अद्याप सुरु आहेत. त्यावेळी मटका चालक उद्धटपणे उत्तरे देतं होते, आम्ही हप्ते देतो आमचे कोण काय करणार आहे. असे असताना सोमवारी पुन्हा राजरोसपणे मटका सुरु असल्याचे उघड झाले आहे.  

संपूर्ण महाराष्ट्रात वीज निर्मितीसाठी प्रसिद्ध असणाऱया कोयनानगरीत अवैध धद्यांना ऊत आला असल्याचे समोर येत आहे. कोयनेची भरभराट अशीच चालणार की पालकमंत्री यात लक्ष घालून या अवैध धंद्ये वाल्यांच्या मुसक्या आवळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र पालकमंत्री यांच्या तालुक्यातच अशा प्रकारे अवैधधंद्ये जोमात सुरु असतील तर बाकीच्या तालुक्यातील परिस्थितीत काय असेल यावरुन अंदाज बांधले जात आहेत.    

Related Stories

31 डिसेंबरला वनपरिक्षेत्रात पार्टी केल्यास कारवाई

datta jadhav

सातारा जिल्हा परिषदेच्या सभेला सदस्यांनी घरूनच उपस्थिती

Archana Banage

विहिरीत पडून रान गव्याचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : शिवसेनेचा कृषी विधेयका विरोधात बैलगाडी मोर्चा

Archana Banage

कृषी विभागातर्फे 1 लाख 17 हजार 730 मेट्रिक टन खत साठा मंजूर

Patil_p

बार्शीतील कोरफळेत एकाचा अनैतिक संबंधातून खून

Archana Banage
error: Content is protected !!