चौकाला काळा फास, परेश म्हणे चौकाचा मीच मालक, चार ठिकाणचा रोजचा गल्ला लाखाच्यावर
विजय जाधव/ गोडोली
साताऱयाच्या पुर्वेकडील प्रवेशव्दारात खेड ग्रामपंचायतीच्या हददीतील असलेल्या बाँम्बे रेस्टारंट चौकात शासकिय जागेत अतिक्रमण आहे. त्यात परेश, रामा, शरदचे मटाका, जुगार या तीन अड्डय़ांवर रोज डे बातार, नाईट बाजारच्या चिठ्ठया गोळा करत लाखेंची उलाढाल होत असून याविरोधात आत्तापर्यंत एकवेळ ही कारवाई झाली नाही. कोणी बोललाच तर थेट वाडय़ावर चला, अशी स्वतःला मालक समजणारा परेश दमबाजी करतो. शरद, रामा हे मोठे हप्ते देतो, म्हणून आमच्यावर कारवाई होत नाही, असे जणू खुले आव्हान जिल्हा पोलीस अधिक्षकांना करतात. शहरात अनेक ठिकाणी मटका, जुगार अड्डय़ावर कारवाई होते. मात्र बाँम्बे रेस्टारंट चौकातील परेश, रामा, शरदच्या अड्डय़ावर कारवाई होत नसल्याने ‘डाल मे कुछ काला धन है’, असे आता खेड परिसरातील नागरिक बोलू लागले आहेत.
ऐतिहासिक सातारा शहरातील बाँम्बे रेस्टारंट चौकाची ओळख सर्वदूर आहे. याच चौकात महामार्ग विभागाची दोन्ही बाजूला असलेल्या जागेत भुरटय़ा गावगुंडांनी जागा बळकावून त्या भाडेतत्वाने दिल्या आहेत. यात जागेतील अतिक्रमणाबाबत ‘तरुण भारत’ने सडेतोड बातम्या करुन हे प्रकरण चव्हाटय़ावर आणले होते. आता पुन्हा हे अतिक्रमण काढण्यासाठी संबंधित विभागाला बळ देण्यासाठी ‘तरुण भारत’ने पुढाकार घेतला आहे.
सातारा शहरात काही ठराविक मटका, जुगार अड्डय़ावर पोलीस कारवाई करतात, मात्र या बाँम्बे रेस्टारंट चौकातील रोज लाखो रुपयांची उलाढाल करणाऱया परेश, रामा, शरदच्या अड्डय़ावर कधीच कारवाई करत नाहीत, याचे अन्य मटकेवाले आश्चर्य व्यक्त करत आहेत. परेश हा तर कोणी काही बोलले तर थेट वाडय़ावर चला, मी या चौकाचा मालक आहे. असा उघड आवाज वाढवतो. तर रामा, शरद हे दोघे तर हप्ते देत असल्याने कारवाई होणार नाही, या गुर्मीत सतत दमबाजी करतात.
चौकात फक्त परेशच्या हुकूमवरुन
बाँम्बे रेस्टारंट चौकात परेशच्या अड्डय़ावर डे आणि नाईट बाजारचा निकाल एका बोर्डावर लिहला जातो. श्रीदेवी डे, पदमावती डे, टाईम बाजार, कल्याण तर श्रीदेवी नाईट, पदमावती नाईट, मन बाजार, राजधानी नाईट, मिलन नाईटचा एका बोर्डवर लिहला जातो. त्या बोर्डावर चिठ्ठी तपासून घ्या, चिठ्ठीशिवाय पेमेंट मिळणार नाही, असे परेशच्या हुकमावरुन असे लिहिले गेले आहे. या चौकातील एक मालक सध्या मोक्का कारवाईत जेलमध्ये असून त्याच्या जागेवर आता परेश मालक म्हणून मिरवतोय.
बॉम्बे रेस्टॉरंट चौकाला काळा फास
औद्योगिक वसाहतीतून येणारे कामगार मटका, जुगार अड्डय़ावर गर्दी करताना दिसतात. कौटुंबिक व्यवस्थाच उध्वस्त करणाऱया मटका आणि जुगार अड्डय़ांना पोलीस हद्दपार करु शकतात. मात्र कधीतरी किरकोळ कारवाई करत आम्ही सजग आहोत हे दाखविणारे पोलीस ठोस कारवाई का करत नाहीत? असा सवाल बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील विक्रेते, व्यवसायिक आणि नागरिक करतात. या चौकाला वेगळा इतिहास असून तो मटका, जुगार अड्डय़ाने काळा केला आहे. अनेकांच्या संसाराला फास लावत परेश, शरद, रामा स्वतः मात्र रोज लाखोची उलाढाल करत करोडपती झाले आहेत.
भगवान के घर मे अंधेरा ही अंधेरा
सातारा शहरात शांतता, सुव्यवस्था ठेवणाऱया शहर पोलिसांच्या हद्दीत बॉम्बे रेस्टॉरंट चौक येतो. नेहमीच कोणत्याना कोणत्या घटनेमुळे चर्चेत असणाऱया या चौकात राजरोस मटका, जुगार अड्डे हे सुरु असल्याने शहर पोलिसांच्या कर्तव्यावरच संशय व्यक्त केला जात आहे. सातारा विभागाचे डिवायएसपी राजमाने, समीर शेख असताना या चौकातील जुगार, मटका अड्डे बंद होते. गुन्हे अन्वेषण शाखेत सपोनी नानासाहेब कदम असताना सतत कारवाई करुन चांगलीच पोलिसांची दहशत वाढविली होती. सध्या मात्र भगवान के घर मे अंधेरा ही अंधेरा असे बोलले जात आहे. यातून संबंधितांनी बोध घ्यावा, अशी अपेक्षा खेड ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
शरद राम बघ
परेश हा वाडय़ावर चला असे बोलतो तर शरद रामाकडे आणि रामा शरदकडे बोट दाखवून एकमेकांची जिरवत आहेत. परेश, रामा, शरद यांच्या अड्डय़ांवर कारवाई होत नाही याचे श्रेय घेत काहीजण त्यांच्याकडून आर्थिक देवघेव करतात. रोज लाखोची उलाढाल करत शरद राम बघ, परेश शरद बघ, राम परेश बघ असे एकमेकांबद्दल बोलत कोणावरही कारवाई होणार नाही याची काळजी घेत असतात.