Matond Shree Sateri Devi fair on 7th
दक्षिण कोकणातील स्वयंभू व जागृत देवस्थान तसेच लोटांगणाच्या जत्रोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या मातोंड येथील श्रीदेवी सातेरी चा वार्षिक जत्रोत्सव सोमवार 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे . या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले. मात्र गावच्या सातेरी देवीचा जागृत देवस्थान म्हणून नावलौकिक आहे श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला होतो . जत्रोत्सवा दिवशी सकाळपासून ओठया भरणे ,नवस बोलणे ,नवस फेडणे हे कार्यक्रम होतात . सायंकाळी आठ वाजता देवीच्या उत्सव मूर्तीचे मंदिरात आगमन त्यानंतर रात्री अकरा वाजता मंदिर परिसरात दीपोत्सव पालखी सोहळा तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत .
त्याचप्रमाणे हजारो भाविक निर्जळी उपवास करून रात्री मंदिरा भोवती लोटांगण घालून नवस पूर्ण करतात त्यामुळे ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे . त्याचप्रमाणे मंदिरात विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी हे खास आकर्षण ठरत. या जत्रेसाठी मुंबई गोवा व कर्नाटक भागातून भावी देवीच्या दर्शनासाठी येतात तरी या जत्रोत्सवा दिवशी भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मातोंड गावकर मंडळी व देवस्थान कमिटी यांनी केले आहे .