बेळगाव प्रतिनिधी – मौलाना आझाद मॉडर्न स्कूल शाळा क्रमांक १ मच्छे येथे स्थलांतरित करावे या मागणीसाठी त्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचे रॅगिंग त्या परिसरातील काही तरुण करत आहेत, त्यामुळे विद्यार्थी तसेच शिक्षक तणावाखाली आहेत. शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे तेथून मच्छे येथे शाळा स्थलांतरित करावी असे निवेदनात म्हणले आहे. शिवाय शिक्षकांच्या काही जागा रिक्त आहेत, त्या तातडीने भराव्यात असे निवेदनात म्हणले आहे. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
Trending
- विशाल पाटलांशी माझा उत्तम संवाद ! वेगळी भूमिका घेणार नाहीत : संजय राऊत
- वीज खांबावर झटका लागून लाइनमनचा मृत्यू
- उत्तर, दक्षिण गोवा मिळून 22 उमेदवारांचे अर्ज
- वीजमंत्र्यांनी द्यावा राजीनामा
- वीरेश बोरकर हे खरे तर ‘बल्लाळदेव’
- ताळगाव पंचायतीचा एक उमेदवार बिनविरोध
- अशोकनगरात 7 लाखांची जबरी चोरी
- जीवदया बेतली युवकाच्या जीवावर