Tarun Bharat

मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप बंद

केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी देण्यात येणारी मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप बंद करण्यात आली आहे. केंद्र सरकारने संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल शिष्यवृत्ती बंद करण्यासंबंधी माहिती दिली आहे. ही योजना अन्य योजनांना प्रभावित करत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत केरळमधील काँगेस खासदार टी.एन. प्रतापन यांच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे.

मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप योजना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून लागू करण्यात आली होती. युजीसीच्या आकडेवारीनुसार 2014-15 आणि 2021-22 दरम्यान 6.722 उमेदवारांच निवड करण्यात आली होती. संबंधित कालावधीत 738.85 कोटी रुपयांची फेलोशिप वितरित करण्यात आली होती. परंतु ही योजना सरकारकडून लागू करण्यात येत असलेल्या अन्य योजनांना प्रभावित करत असल्याचे आढळून आले होते. याचमुळे 2022-23 पासून मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे इराणी यांनी सांगितले आहे.

Related Stories

हैदराबादमध्ये 8 सिंह कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

ओमिक्रॉनचे निदान करणाऱ्या ‘ओमिशुअर’ला मंजुरी

datta jadhav

उत्तराखंडात कोरोना रुग्णांनी ओलांडला 70 हजारांचा टप्पा

Tousif Mujawar

पंतप्रधानांच्या सुरक्षेसंबंधी मल्होत्रा समितीकडून तपास

Patil_p

गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांची आत्महत्या

Patil_p

खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोना चाचणी मोफत करा

Patil_p