Mauli Jatrotsav on 7th and Satarda Rawalnath Jatrotsav on 8th November
सातार्डा गावचे जागृत ग्रामदैवत श्री रवळनाथ – देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि 7 नोव्हेंबर रोजी व श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पारंपरिक कौल सोहळा मंगळवार दि 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
जत्रोत्सवादिवशी सोमवारी सकाळी देवस्थानच्या विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.सुहासिनिंनी ओट्या भरणे,भाविकांची गाऱ्हाणी होणार आहेत.रात्री 11 वाजता पालखी प्रदक्षिणा होणार आहे. त्यानंतर रात्री 1 वाजताच्या दरम्यान आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
दुसऱ्या दिवशी मंगळवार दि 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री रवळनाथ पंचायतन देवस्थानचा पारंपरिक कौल सोहळा होणार आहे. सायंकाळी 4 वाजता कौल सोहळ्याला सुरुवात होणार आहे. भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन देवस्थान उपसमितीच्यावतीने करण्यात आले आहे.
सातार्डा / प्रतिनिधी