Tarun Bharat

‘मविआ’च्या महामोर्चाला अटीशर्थींसह परवानगी

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

महाविकास आघाडीच्या उद्याच्या (दि.17) महामोर्चाला मुंबई पोलिसांनी अटीशर्थींसह परवानगी दिली आहे. हा मोर्चा शांततेत आणि नियमांचे पालन करुन काढावा, असे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

काय असतील अटी?

मोर्चा शांततेत निघावा.
मार्चात असभ्य वागणूक असू नये.
नियोजित मार्गावरुनच मोर्चा जावा.
आर्म ऍक्टनुसार मोर्चात चाकू, तलवार आणि इतर कोणतंही घातक शस्त्र वापरू नये.
मोर्चा दरम्यान कुठेही फटाके फोडू नये.
कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. यात दोन अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह 8 ते 10 पोलीस उपायुक्त यांच्याद्वारे हा बंदोबस्त हाताळण्यात येणार आहे. सोबतच या मोर्चात एसआरपीएफच्या वाढीव तुकडय़ांचाही बंदोबस्त लावण्यात येणार. ड्रोनच्या माध्यमातूनही पोलीस या मोर्चावर लक्ष ठेवणार आहेत.

अधिक वाचा : अमेरिकेने बनवला कृत्रिम सूर्य

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी महापुरूषांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळय़ातील रिचर्डसन्स ऍन्ड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला उत्तर म्हणून उद्या मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Stories

ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोना बाधिताचा मृत्यू

Patil_p

गणेशोत्सव मंडळांना मुंबई महापालिकेचा दिलासा! व्यावसायिक जाहिरातींना मुभा

Tousif Mujawar

शिवसेनेचे आणखी 2 आमदार फुटणार; संदिपान भुमरेंचा गौप्यस्फोट

datta jadhav

महाराष्ट्रात कधी होणार मान्सूनचे आगमन; IMD विभागाची अपडेट

Archana Banage

सोलापूर शहरात २९ तर ग्रामीणमध्ये १७१ रुग्णांची भर; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

Archana Banage

आ. जयकुमार गोरे यांच्यासह दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले

Patil_p