Tarun Bharat

महापौर-उपमहापौर आरक्षण जाहीर

24 व्या कार्यकालावधीसाठी आरक्षण

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव महापालिका निवडणूक होऊन वर्ष होत आले. मात्र अद्याप महापौर-उपमहापौर निवड झाली नाही. पण महापालिकेच्या 24 व्या कार्यकालावधीसाठी महापौर-उपमहापौर आरक्षण जाहीर केले आहे. महापौरपद सामान्यांसाठी व उपमहापौरपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असणार आहे. आरक्षण जाहीर झाले असले तरी 21 व्या कार्यकालावधीसाठी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार महापौर-उपमहापौर निवडणूक घेणे बंधनकारक आहे.

नगरविकास खात्याने राज्यातील दहा महापालिकांच्या महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीसाठी आरक्षण जाहीर केले आहे. काही महापालिकांच्या महापौर-उपमहापौरांचा कार्यकालावधी 1 मार्चला संपत आहे. त्यामुळे नगरविकास खात्याच्या नियमानुसार निवडणुकीपूर्वी महापौर-उपमहापौर आरक्षण जाहीर करण्यात येते. त्यासोबत बेळगाव महापालिका महापौर व उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन वर्ष होत आले. पण 21 व्या कार्यकालावधीसाठी महापौर-उपमहापौर निवड झाली नाही. दि. 28 फेब्रुवारी 2019 रोजी प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली होती. वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने महापालिका निवडणूक लांबणीवर पडली आहे.

बेंगळूर हायकोर्टाने निवडणूक घेण्याची सूचना केली असल्याने नगरविकास खात्याने वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करून निवडणुका घेतल्या आहेत. पण सप्टेंबर 2021 मध्ये महापालिकेच्या निवडणुका घेण्यात आल्या आहेत. वास्तविक, महापालिका निवडणूक झाल्याने महापौर-उपमहापौर निवड करण्याची गरज होती. पण आरक्षणाच्या मुद्यावर वाद निर्माण झाल्याने महापौर-उपमहापौर निवडणूक झाली नाही. मात्र 24 व्या कार्यकालावधीकरिता महापौर-उपमहापौर आरक्षण जाहीर झाले आहे.

आरक्षणाप्रमाणे निवडणूक होणार

 21 व्या कार्यकालावधीनुसार महापौर-उपमहापौर निवड घेण्याचे स्पष्टीकरण नगरविकास खात्याने दिले आहे. त्यामुळे या आरक्षणानुसार महापौर-उपमहापौर निवड करणे बंधनकारक आहे. नगरविकास खात्याने यापूर्वी 22, 23 व्या कार्यकालावधीकरिता आरक्षण जाहीर केले होते. आता 24 व्या कार्यकालावधीकरिता आरक्षण जाहीर झाले आहे. सध्या महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने महापौर-उपमहापौर आरक्षणाचा उपयोग होणार नाही. मात्र आगामी काळात महापालिका निवडणुका झाल्यास नगरविकास खात्याने जाहीर केलेल्या आरक्षणाप्रमाणे महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक होणार आहे.

महापौर-उपमहापौर आरक्षण…

महापालिकामहापौरउपमहापौर
बळ्ळारीमागासवर्ग महिलासामान्य महिला
बेळगावसामान्यअनुसूचित जाती महिला
दावणगेरेसामान्य महिलामागासवर्ग महिला
हुबळी-धारवाडसामान्य महिलासामान्य
गुलबर्गाअनुसूचित जातीसामान्य
मंगळूरसामान्यसामान्य महिला
म्हैसूरसामान्यमागासवर्ग महिला
शिमोगामागासवर्गसामान्य महिला
तुमकूरअनुसूचित जाती महिलामागासवर्ग
विजापूरअनुसूचित जमातीमागासवर्ग

Related Stories

बैलूर-तोराळी परिसरातील विद्यार्थ्यांचे अपुऱया बससेवेमुळे हाल

Amit Kulkarni

चोर समजून केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

Patil_p

शहापूर महालक्ष्मी देवीचा वाढदिवस उत्साहात

Amit Kulkarni

गोकर्ण येथे अरबी समुद्रात बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू

Omkar B

हिंडलगा कारागृहातील आणखी एका कैद्याचा मृत्यू

Amit Kulkarni

मल्लिकार्जुन कलादगी यांच्या बदलीमागे राजकारण

tarunbharat