Tarun Bharat

दोडामार्ग बाजारपेठेतील मोऱ्यांची नगराध्यक्षांनी केली पाहणी

Advertisements

Mayor inspected the stalls in Dodamarg market

दोडामार्ग बाजारपेठेतील पावसाचे पाण्याने व गाळ तसेच घाण व कचऱ्याने तुंबलेल्या दोन मोऱ्या येत्या दीपावलीपूर्वी साफ करून देण्याची ग्वाही येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल बडे यांनी आज दिली. नगराध्यक्ष चेतन चव्हाण व अन्य नगरसेवकांनी श्री. बडे यांना घेऊन या मोऱ्यांची पाहणी केली असता श्री. बडे यांनी ही ग्वाही दिली.


दोडामार्ग बाजारपेठेतील आयी रोडवरील पिंपळेश्वर हॉल नजीकची मोरी तसेच सावंतवाडी रोडवरील गावडेवाडीच्या प्रवेशद्वारावरील मोरी अशा दोन मोऱ्या पावसाचे पाणी , गाळ, तसेच घाण व कचऱ्याने तुंबतात व त्यामुळे गटारातून वाहणारे पाणी देखील पुढे न सरकता तिथेच साठून राहते सदर मोऱ्या या सर्वजनिक  बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने आज नगराध्यक्ष श्री. चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितीन मणेरीकर, माजी नगरसेवक संतोष म्हावळणकर, भाजपचे माजी शहराध्यक्ष समीर रेडकर, व स्वप्नील गवस, यांनी श्री. बडे यांच्यासोबत दोन्ही मोऱ्यांची पाहणी केली.

दोडामार्ग / वार्ताहर

Related Stories

बिबटय़ाने केलेल्या हल्ल्याची 3 वर्षाने मिळाली नुकसान भरपाई

Patil_p

बनावट कागदपत्रे देऊन युनियन बँकेला 5 कोटींचा चुना

Patil_p

परतीच्या प्रवासासाठी 133 एसटीचे बुकींग

NIKHIL_N

खुनाचा प्रयत्नप्रकरणी दुसऱयांदा जामीन नाकारला

NIKHIL_N

कणकवलीत बॉक्सेल ब्रिजची भिंत कोसळली

NIKHIL_N

खेमराज मेमोरियलमध्ये विद्यार्थीनींना सायकल वाटप

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!