Tarun Bharat

एमसी मेरी कोमच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताची आंतरराष्ट्रीय महिला बॉक्सर तसेच सहावेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱया एमसी मेरी कोमला गेल्या काही. दिवसांपासून गुडघा दुखापतीची समस्या वारंवार भेडसावत होती. मंगळवारी तिच्या या गुडघ्यावर मुंबई हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मेरी कोमच्या डाव्या पायाच्या गुडघ्यातील स्नायू प्रमाणापेक्षा अधिक ताणले गेल्याने तिला वारंवार वेदना होत होत्या. या दुखापतीसाठी तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला. काही दिवस तिच्यावर वैद्यकीय इलाज सुरू होता. पण अखेर या दुखापतीवर शस्त्रक्रियेची जरुरी असल्याने तिने शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय घेतला. अँटीरिअर प्रुसेट लिगामेंट (एसीएल) या व्याधीवर मंगळवारी मुंबई हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. मेरी कोमला काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार आहे.

39 वर्षीय मेरी कोमला या दुखापतीमुळे बर्मिंगहम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मुष्टीयुद्ध प्रकारात सुवर्णपदक मिळविणारी मेरी कोम ही भारताची पहिली महिला मुष्टीयोद्धा आहे. तिने आपल्या वैयक्तिक मुष्टीयुद्ध कारकीर्दीत अनेकवेळा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदके मिळविली असून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिला उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले होते. या दुखापतीमुळे 8 ते 20 मे दरम्यान झालेल्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत तिला सहभागी होता आले नव्हते.

Related Stories

टोकियो ऑलिम्पिक पथसंचलनात सिंधू भारताची ध्वजधारक

Amit Kulkarni

विनेश फोगटला सुवर्ण

Patil_p

शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी

Patil_p

भारतीय रोईंग संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p

जर्मनीचा व्हेरेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

फख्र झमान न्यूझीलंड दौऱयातून बाहेर

Omkar B
error: Content is protected !!