वार्ताहर /उचगाव
तुरमुरी येथील तुरमुरी प्रिमियरच्यावतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेमध्ये एमडी स्पोर्ट्स यांनी प्रथम क्रमांक, मोरया स्पोर्ट्स यांनी द्वितीय क्रमांक व सीपीएस स्पोर्ट्स यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. तुरमुरी प्रिमियर या गाव मर्यादित क्रिकेट स्पर्धो आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण तुरमुरी ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष नागराज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशराम तंगणकर, बाळू (पिंटू) बांडगे, वामन मेघोचे, प्रभाकर कांबळे, तुरमुरी ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष चांगो बेळगावकर, यल्लाप्पा मेघोचे, म्हात्रु डोंबले, प्रशांत जाधव, मल्लाप्पा डोंबले, रामलिंग जाधव, डॉ. विठ्ठल बांडगे उपस्थित होते. या प्रमुख उपस्थितांच्या हस्ते फोटो पूजन तसेच क्रिकेट मैदान व यष्टो पूजन करण्यात आले. य् ाा क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 11111 रुपये व चषक नागराज जाधव यांनी, दुसरे बक्षीस 7111 रुपये व चषक प्रभाकर कांबळे यांनी तर तिसरे बक्षीस 5111 रुपये व चषक वामन मेघोचे यांनी पुरस्कृत केले होते. यावेळी सर्व खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले.