Tarun Bharat

‘मी ऊर्जिता’ व्यासपीठ महिलांसाठी प्रेरणादायी

महिलांचा भरघोस प्रतिसाद : सीपीएड मैदानावरील घरकुल प्रदर्शनांतर्गत मनोरंजनपर कार्यक्रम : विविध खेळांनी आणली रंगत

प्रतिनिधी /बेळगाव

विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून आकाशाला गवसणी घालतानाच जमिनीवर घट्ट पाय रोवून वास्तवाचे भान जपणारी स्त्राr, घर आणि करिअर या दोन्ही आघाडय़ा यशस्वीपणे सांभाळते. याचे कारण म्हणजे तिच्यात असणारी  ऊर्जा. तिची हीच ऊर्जा ‘अक्षय’ ठेवण्यासाठी तरुण भारतने ‘मी ऊर्जिता’ हे व्यासपीठ सुरू केले आहे. या व्यासपीठावरून झालेल्या पहिल्याच कार्यक्रमाला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

‘मी ऊर्जिता’तर्फे आयोजित सीपीएड मैदानावरील घरकुल प्रदर्शनांतर्गत झालेल्या मनोरंजनपर कार्यक्रमात महिलांनी एक मिनीट या खेळाबरोबरच आपल्यातील कलागुणांचेही सादरीकरण केले. मी स्त्राrत्वाची जाण, स्त्राrत्वाचा अभिमान… या ऊर्जिताच्या शीर्षक गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मनीषा सुभेदार यांनी ‘मी ऊर्जिता’चा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर ज्यांच्याकडे अधिक नाणी आहेत, ज्यांच्याकडे सर्वाधिक लहान मोबाईल आहे, ज्यांच्याकडे सर्वात लहान पर्स आहे असे विविध प्रश्न विचारत ऑन द स्पॉट बक्षिसे देण्यात आली. या खेळात ज्योती देसाई, विमला, नवीना शेट्टीगार, भाग्यश्री कालकुंद्रीकर, श्रेया तिगडीकर, सईदाबानू चौधरी, दीपाली पवार, मानसी निंबाळकर, सोनम पाटील, स्नेहल भोसले या विजेत्या ठरल्या.

त्यानंतर 8 महिलांना व्यासपीठावर बोलावून चौकोनी कागदाची लांबी वाढविणे ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये महालक्ष्मी बेळुबी विजेत्या ठरल्या. त्यानंतर दिलेल्या दोऱयाची गाठ बांधणे ही स्पर्धा झाली. जितक्मया गाठी तो विजेता असे स्पर्धकांना वाटले होते. परंतु त्या गाठी पुन्हा सोडविणे ही या खेळातील मेख होती. मुख्य म्हणजे ही स्पर्धा तीन जोडप्यांमध्ये झाली. त्यामध्ये पूजा व सतीश पालकर जोडपे विजेते ठरले.

‘फिक्स इन द माऊंटन’ या स्पर्धेत 20 हून अधिक महिलांनी भाग घेतला होता. त्यांच्यात गट करत करत अंतिम फेरीत सोनम पाटील व आशा बिरगड्डी विजेत्या ठरल्या. कलाकौशल्यमध्ये विनोदी सादरीकरणासाठी नजहत मोमीन, गाण्यासाठी सायली चौगुले व आशा बिरगड्डी यांनी बक्षिसे मिळविली. पुरुषांसाठी घेण्यात आलेल्या ‘माझी ऊर्जिता’ म्हणजेच आपल्या पत्नीबद्दल बोलावयाचे होते. त्यामध्ये कर्नल विश्वनाथ पाटील विजेते ठरले.

‘मी ऊर्जिता’ शीर्षक गीतासाठी चंद्रज्योती देसाई यांना बक्षीस देण्यात आले. यानंतर तरुण भारतच्या कार्यकारी संचालक रोमा ठाकुर यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक बांदेकर यांनी केले.

महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन

तरुण भारतच्या ‘मी ऊर्जिता’ याची सदस्य नोंदणी सुरू आहे. महिलांना 600 रुपये शुल्क भरून सदस्यत्व स्वीकारता येईल. तरुण भारत कार्यालयात मी ऊर्जिताचे फॉर्म उपलब्ध असून महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

कामगार मंत्र्यांसमोर शेतकऱयांची जोरदार निदर्शने

Patil_p

तेल दरवाढीने फोडणी महागली

Patil_p

मळेकरणीदेवी मंदिर परिसरात जायंट्स सखीतर्फे डस्टबीनचे वितरण

Amit Kulkarni

कर्मचारी महिलांच्या सुरक्षिततेसाठी हॉस्टेलची निर्मिती

Amit Kulkarni

तहसीलदारांकडून अंगणवाडी पोषण आहार कामकाजाची पाहणी

Patil_p

सीमाप्रश्न लोकेच्छेने सुटावा यासाठीच नाथ पै यांचे अथक प्रयत्न

Amit Kulkarni