‘मला आंबा (Mango)आडवत नाही’ असे कोणीच म्हणत नाही. रंगापासून, आकारापासून ते चवीपर्यंत प्रत्येकाच्या जिभेवर तरळत राहणाऱ्या आंब्याचा हंगाम आता ऐन भरात आहे.आंब्याचा दरही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा आहे. त्यामुळे घरोघरी आता आंबा जाऊन पोहोचला आहे. देवगड, हापूस, पायरी, केशर, लालबाग या जातीचे आंबे विशेषत: खाण्यास पसंदी दिली जाते. त्यातच शाळांना सुट्टी असल्याने बाल चमुंनी तर आंब्यावर ताव मारण्यास सुरुवात केली आहे. एकदा बसल्या पेट्टाला ६ आंबे खाऊनच उठतो असे म्हणणारे बहाद्दर अनेकजण आपल्याला पाहायला मिळतात. घड्याळातील वेळ पाहून आंबे खाणारे हाताच्या बोटावरच. आली चव की ताव मारणारेच जादा. काही-काहींना तर आंबा खाण्याची हुक्की आली की ताव मारायची सवय असते. आणि काहींना जेवणानंतर आंबा खाण्याची आवड असते. पण तुम्हाला माहित आहे का रात्री जोवणानंतर आंबे खाल्याने त्याचे काय परिणाम होणार ते. नाही ना चला तर मग जाणून घेऊया.


आंबा हे असे फळ आहे की नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. आंब्याच्या सिझनला आंब्यापासून अनेक रेसीपी बनवण्याचा गृहिणींचा कल असतो. मात्र हे फळ खात असताना त्याचे काही परिणामही होत असतात. खरतर दिवसा राजासारखं आणि रात्री भिकाऱ्यासारख जेवाव ही म्हण आंब्याच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. कारण रात्रीचे जेवण झाल्यावर आंबे खाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उध्दभवतात.


वजन वाढू शकते
रात्रीचा आहार हलका घ्यावा असे नेहमीच आहातज्ञ सांगत असतात. अशावेळी रात्री पोटभर जेवण झाल्यानंतर आंबा खाल्याने वजन वाढू शकते. कारण आंबा हे असे फळ आहे की एक किंवा दोन खाऊन आपले समाधान होत नाही. अशावेळी आधीच पोटभर जेवण केलेले असते त्यात परत आंबा खाल्ला की नियमित आहारापेक्षा याचे प्रमाण जादा होते. याचा परिणाम म्हणून वजन वाढते.


या आजारांचा करावा लागतो सामना
आंबा हा उष्ण असल्याने शरीराचे तापमान देखील वाढवू शकतो. त्यामुळे त्वचेच्या समस्या उध्दभवू शकतात. याच बरोबर रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाल्ला तर तुम्हाला अतिसार किंवा उलट्या होऊ शकतात. आंब्याचा ज्यूस, शेक पिणे टाळावे. यामुळे वजन वाढते. वाढल्याने वजनाने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डायट करणाऱ्यांनी रात्रीचा आंबा खाणे टाळावे. आंबा सकाळी अकरा ते चार यावेळेत खावा.