Tarun Bharat

राखीव अनुदानातून करणार वैद्यकीय उपचार

स्वच्छता कामगारांसाठी आरोग्य तपासणी मोहिमेस लवकरच प्रारंभ

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱयांची आरोग्य तपासणी सहा महिन्यांतून करण्यात येते. महात्मा गांधी आरोग्य योजनेंतर्गत स्वच्छता कर्मचाऱयांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच महापालिकेच्या राखीव अनुदानातून उपचारासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत स्वच्छता कर्मचाऱयांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

आपले आरोग्य धोक्मयात घालून स्वच्छता कामगार काम करीत असतात. त्यामुळे दर सहा महिन्यांतून एकदा आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येते. तसेच महापालिकेच्यावतीने विमा योजनेंतर्गत उपचार केला जातो. पण आता महात्मा गांधी आरोग्य योजनेंतर्गत स्वच्छता कामगारांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आरोग्य तपासणीनंतर कोणत्याही कर्मचाऱयास आजार जडल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मागासवर्गीय राखीव अनुदानातून निधीची तरतूद करण्यात आली आहे. 27.60 टक्के राखीव अनुदानातून वैद्यकीय उपचार केला जाणार आहे.

1260 कर्मचाऱयांना लाभ होणार

महापालिकेत हंगामी तत्त्वावर 1100 स्वच्छता कामगार व 150 हून अधिक कायमस्वरुपी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे 1260 कर्मचाऱयांना आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ होणार आहे. स्वच्छतेचे काम करताना स्वच्छता कामगार गंभीर आजारांकडे दुर्लक्ष करीत असतात. तसेच वैद्यकीय खर्चाचा विचार करून उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे आरोग्य तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. संपूर्ण शरीराची आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार केला जाणार आहे.

Related Stories

बेळगावमधील शिवभक्त तरुणांवरील राजद्रोहाचे गुन्हे मागे घ्या

Abhijeet Khandekar

सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना, साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Amit Kulkarni

किणये ग्रा. पं. मध्ये नवीन चेहऱयांना संधी

Patil_p

कारवार जिल्हय़ात दुसऱया टप्प्यात मतदान सुरळीत

Patil_p

महात्मा फुले रस्त्याशेजारील पेव्हर्सचे काम अर्धवट

Amit Kulkarni

खानापुरात तहसीलदार कार्यालयाकडून उत्पन्न दाखला देण्यास गेंधळ

Amit Kulkarni