अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम ः अँडी मरे, सेरेना विल्यम्स, मॅडिसन किज, अँडेस्क्मयू पराभूत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत रशियाचा टॉप सीडेड डॅनियन मेदव्हेदेव, ऑस्ट्रेलियाचा किरगॉईस, तसेच महिला विभागात अमेरिकेची कोको गॉफ, कॅरोलिनी गार्सिया, पोलंडची जेबॉर यांनी चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. दरम्यान, ब्रिटनचा माजी टॉपसीडेड अँडी मरे, अमेरिकेची माजी टॉपसीडेड सेरेना विल्यम्स, मॅडिसन किज आणि कॅनडाची अँडेस्क्मयू यांचे आव्हान तिसऱया फेरीतच संपुष्टात आले. सेरेनाची ही शेवटची स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर ती टेनिसमधून निवृत्त होत आहे.
पुरुष एकेरीच्या शुक्रवारी तिसऱया फेरीतील झालेल्या सामन्यात रशियाचा टॉपसीडेड तसेच या स्पर्धेतील विद्यमान विजेता मेदव्हेदेवने चीनच्या वू ईबिंगचा 6-4, 6-2, 6-2 अशा सेट्समध्ये फडशा पाडत चौथी फेरी गाठली. हा सामना दोन तास चालला होता. मेदव्हेदेवचा पुढील फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसबरोबर होणार आहे. एटीपी मानांकनात मेदव्हेदेव अग्रस्थानावर असून तो आपले हे स्थान शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कॅनडामध्ये झालेल्या एटीपी मास्टर्स-1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेमध्ये किरगॉईसने मेदव्हेदेवचा पराभव केला होता. चौथ्या फेरीत किरगॉईसकडून मेदव्हेदेव पराभूत झाल्यास त्याला एटीपीतील आपले अग्रस्थान गमवावे लागेल.
तिसऱया फेरीतील अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसने अमेरिकेच्या उल्फचा 6-4, 6-2, 6-3 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना दोन तास चालला होता. अन्य एका सामन्यात ब्रिटनच्या माजी टॉपसीडेड अँडी मरेचे आव्हान तिसऱया फेरीतच समाप्त झाले. इटलीच्या मॅटो बेरेटेनीने अँडी मरेचा 6-4, 6-4, 6-7 (1-7), 6-3 असा पराभव केला. हा सामना साडेतीन तास चालला होता. मरेने यापूर्वी तीनवेळा ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपद पटकाविले आहे. 2019 साली या स्पर्धेत बेरेटेनीने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
महिला एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स तसेच मॅडिसन किज यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र, अमेरिकेच्या कोको गॉफने तिसऱया फेरीतील सामन्यात आपल्याच देशाच्या मॅडिसन किजचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. आता गॉफचा पुढील फेरीतील सामना चीनच्या झेंग शुईशी रविवारी होत आहे.
अमेरिकेची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू 41 वषीय सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलियाच्या ऍजेला टॉमलिजेनोव्हिकने पराभूत केले. टॉमलिजेनोव्हिकने सेरेनावर 7-5, 6-7 (4-7), 6-1 अशी मात करत चौथी फेरी गाठली. या सामन्यानंतर आर्थर ऍश स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या हजारो टेनिस शौकिनांनी सेरेनाला तिच्या निवृत्ती निर्णयाबाबत उभे राहून मानवंदना दिली.
फ्रान्सच्या 17 व्या मानांकित कॅरोलिनी गार्सियाने कॅनडाच्या बिनाका अँड्रेस्क्मयूचे आव्हान 6-3, 6-2 असे संपुष्टात आणले. गार्सियाने हा विजय दीड तासाच्या कालावधीत मिळविला. गार्सियाचा पुढील फेरीतील सामना अमेरिकेच्या ऍलिसन रिसेकी-अमृतराजबरोबर होणार आहे. ऍलिसन रिसेकी-अमृतराजने तिसऱया फेरीतील सामन्यात वेंग झियुचा 6-4, 3-6, 6-4 असा पराभव केला. अमेरिकेच्या गॉफचा चौथ्या फेरीतील सामना झेंग शुईबरोबर होणार आहे. शुईने तिसऱया फेरीतील सामन्यात रिबेका मॅरिनोचे आव्हान 6-2, 6-4 असे संपुष्टात आणले. पोलंडच्या जेबॉरने शेलबाय रॉजर्सवर 4-6, 6-4, 6-3 अशी मात करत पुढील फेरी गाठली. 2022 टेनिस हंगामातील ही शेवटची ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा आहे.