Tarun Bharat

मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

ठाण्यात एकनाथ शिंदे समर्थकांच्या शक्तीप्रदर्शनात सामील झालेल्या ठाणे जिल्हासंघटक मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरेंच्या आदेशाने मीनाक्षी शिंदे यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी यासंदर्भातील पत्र दिले आहे.  

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेचे जवळपास 41 आमदार शिंदे यांच्या गटात सामील आहेत. आमदारांच्या बंडामुळे सरकार अस्थिर झाले आहे. असे असतानाच 25 जूनच्या सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणा दिल्या. या समर्थकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फलकांसह ‘शिवसेना’ नावाचा उल्लेख असलेले आणि ‘धनुष्यबाणा’ची निशाणी असलेले झेंडे हातात धरले होते. या वेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गाडीवर उभे राहून समर्थकांशी संवाद साधला. ठाणे येथील शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही या ठिकाणी उपस्थित होते. माजी महापौर नरेश म्हस्के तसेच ठाणे जिल्हा महिला प्रमुख मीनाक्षी शिंदे यांचीही या ठिकाणी उपस्थिती होती.

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्केही यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला. तर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत मीनाक्षी शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 

Related Stories

ओमिक्रॉनमुळे भारतावर पुन्हा आर्थिक संकट ?

Sumit Tambekar

एनडीआरएफच्या दोन तुकड्या कोल्हापूकडे रवाना

Rahul Gadkar

“अमर, अकबर, अँथनी अशी यांची तीन तोंडं…”, मंत्री दानवेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Abhijeet Shinde

मराठा बँकेतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार

Nilkanth Sonar

यंदाचा नोव्हेंबर १४२ वर्षांच्या इतिहासात चौथा सर्वाधिक उष्ण महिना

Sumit Tambekar

आयएएस पूजा सिंघल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी निलंबित

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!