Tarun Bharat

कसबे डिग्रज येथे क्षारपड जमिनीबाबत बैठक

कसबे डिग्रज/प्रतिनिधी

कसबे डिग्रज येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प अंतर्गत पथदर्शी भूमिगत चर योजनेच्या संदर्भात बैठक पार पडली. यावेळी जेष्ठ नेते आनंदराव नलवडे, अधीक्षक अभियंता बापूसाहेब गाडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र शासन ८० टक्के व लाभार्थी शेतकरी २० टक्के असे योजनेचे स्वरूप आहे. या प्रकल्पामुळे सच्छिद्र निचरा प्रणाली द्वारे व बंदिस्त चरीद्वारे शेतातील अतिरिक्त पाण्याचा चांगल्या पद्धतीने निचरा होऊन जमिनीत चांगली सुधारणा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सहभागाची रक्कम लवकर जमा करावी. शेतकरी व अधिकारी यांनी एकत्रित काम करून हा प्रकल्प राबवावा. या क्षारपड प्रकल्पासाठी राजारामबापू कारखान्याचेही सहकार्य लाभणार आहे. यावेळी भाग्यलक्ष्मी पाणीपुरवठा संस्थेने २० टक्के रक्कमेचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी अधिकारी वर्ग, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी यासह शेतकरी उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

सांगली : डॉ. आंबेडकर क्रीडांगणाचा कायापालट होणार; वॉकिंग ट्रॅकसह विद्युत व्यवस्था होणार

Abhijeet Shinde

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यवाही करा : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत नागरिकांनी रस्त्याचे काम बंद पाडले

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा 400 पार, 21 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

तासगाव तालुक्‍यात एकाच दिवशी 148 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्या बंधूंचे निधन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!