सावंतवाडी /प्रतिनिधी –
भाजपचे गोव्याचे प्रदेशअध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मंगळवारी सावंतवाडी येथे भेट दिली. विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार माजी आमदार राजन तेली यांच्या प्रचारार्थ त्यांनी सावंतवाडी दोडामार्ग भागात गावा-गावात प्रचारार्थ भेटी दिल्या होत्या. ते म्हणाले गतवेळी आम्ही थोडक्यात कमी पडलो पण आता पुन्हा तो विजय आम्ही खेचून आणू. आगामी निवडणुकीत मी प्रचारार्थ पुन्हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी घेणार असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सदस्य पुखराज पुरोहित व कुमार पुखराज उपस्थित होते. श्री तानावडे यांनी गोव्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यापासू भाजपला चांगले दिवस आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा सत्ता आणली आहे.