Tarun Bharat

रावतेंचे भाषण ऐकून सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर

सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांचे मला कौतुक : शासकीय विश्रामगृहात घुमला शिवसेनेचा आवाज

Advertisements

प्रतिनिधी/सातारा

सातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मला सार्थ अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जिल्हा असूनही एकही शिवसैनिक त्यांच्याकडे गेला नाही. हीच खरी निष्ठा हेच खरे प्रेम सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उद्धव साहेबांच्यावर दाखवून दिले. मातोश्रीवर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी प्रेम केले आहे, मला मनापासून कौतुक वाटते. जिल्ह्यातील शिवसैनिकांचे, असे मत मांडून माजी मंत्री दिवाकर रावते यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण केले. दरम्यान, त्यांनी केलेल्या भाषणाने जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या डोळय़ातून अश्रू आले. दरम्यान, हा आवाज कुणाचा शिवसेनेचा, असाही आवाज शासकीय विश्रामगृहात घुमला.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून माजी मंत्री दिवाकर रावते यांची शिस्त, यांचा दरारा जिह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा अनुभवला आहे. बैठकीला जरा जरी उशीरा पोहचले तर लगेच त्यास चांगल्या शब्दात फटकात असतं. वेळेच भान पाळण्याच्या सुचना रावते देत असतं. त्यामुळे रावते हे येणार अशी फोनाफोनी सकाळीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना झाली. अने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक साताऱ्याकडे पोहचू लागला. दुपारी 3 ची बैठक असल्याने मिळेल त्या वाहनाने मिळेल तसा शिवसैनिक शासकीय विश्रामगृहात पोहचू लागले. दुपारी तीन वाजताच जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी जमा होवू लागले. शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.

त्यातच भाजपाची बैठक असल्याने शिवसैनिकांनीही बैठकीचे नियोजन कसे होणार याचीच चर्चा करत होते. त्याच दरम्यान, यशवंत घाडगे यांनी काही पदाधिकाऱ्यांना स्वागतासाठी फुलांचा बुफे आणायला सांगितले तर काहीजणांना तयारी करायाला सांगितले. तोपर्यंत उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील हे शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात आल्याचे समजताच शिवसैनिकांनी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला. हा आवाज कोणाचा शिवसेनेचा अशा घोषणा देत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दिवाकर रावते हे आले. त्यांचेही स्वागत करण्यात आले. शासकीय विश्रामगृहात त्यांनी उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संख्या पाहून त्यांनी सुरुवातीलाच सातारा जिह्यातील शिवसैनिक कडवट आणि निष्ठावान आहे. मातोश्रीवर प्रेम करणारा आहे. आजही तसूभर प्रेम कमी झाले नाही. मातोश्रीवरुन आदेश निघताच तो आदेश पाळणारा शिवसैनिक म्हणजे सातारा जिल्ह्यातील आहे. शिवसेनेचा एकही पदाधिकारी व कार्यकर्ता फुटला नाही. त्याबद्दल जिल्ह्यातील शिवसैनिकांचे मनापासून कौतुक करतो, असे त्यांनी सांगताच उपस्थित शिवसैनिकांच्या डोळ्य़ातून पाणी आले.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 424 डिस्चार्ज ; 336 नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

जिल्हय़ात आजपासून लसीकरणाची कवचपुंडल मोहीम

Amit Kulkarni

सातारा पालिकेच्या सभेत १४२ विषयावर मंजुरीची मोहर

Abhijeet Shinde

भय इथले संपत नाही….

Patil_p

पालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी : वंचित बहुजन आघाडीची मागणी

Abhijeet Shinde

सातारा : धोम कॉलनीतून एकजण बेपत्ता

datta jadhav
error: Content is protected !!