Tarun Bharat

श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजींची बेळगाव मधील विविध समाजातील प्रमुखांशी भेट

प्रतिनिधी / बेळगाव : सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन विकास साधावा, सर्व प्रथम आपण माणूस आहोत समाजाचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी जाती व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणून सर्व घटकांनी एकत्रित येऊन विकास साधावा असे आव्हान श्री श्री श्री मंजुनाथ भारती स्वामीजींनी केले. बेळगाव मधील अनेक समाज प्रमुखांची त्यांनी भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

यावेळी श्री विश्वकर्मा मनु-मय संस्था, दैवज्ञ ब्राम्हण समाज, भाजपा ओबीसी मोर्च्याचे सचिव तसेच सकल मराठा सामाज्याचे संयोजक किरण जाधव यांनी उपस्थिती दर्शविली.

प्रारंभी संस्था प्रमुखांनी उपस्थितांचे स्वागत केले व समाज्याच्या वतीने स्वामीजींची पाद्य पुजा करून पुष्प हार, श्रीफळ व शाल अर्पण करून वंदन करण्यात आले. विश्वकर्मा मनु-मय संसंस्थेतील मुख्य कार्यकारी मंडळी भारत शिरोळकर, प्रभाकर सुतार, किशोर कणबरकर, सोहन सुतार, किसन ठोकाणेकर, विजय सुतार उपस्थित होते. तसेच दैवज्ञ ब्राम्हण समाज्यातर्फे प्रदीप अरकसाली, अमित हेरेकर, सागर हळदणकर, प्रकाश कलघटकर, सचिन कारेकर किरण कारेकर, गुरुनाथ शिरोडकर, सुरेश चिंचणेकर, विजय सांबरेकर उपस्थित होते. त्याचबरोबर संत गाडगे महाराज सामाज्यातर्फे विठ्ठल पालेकर, मयुर चव्हाण, विष्णु सारोळकर, विनायक पवार, विक्रम किल्लेकर, ज्योतिबा उपरडेकर, सतीश लकले, मांगांना पालेकर, परशराम अष्टेकर, लखन पारिट, राजू यांनी उपस्थिती दर्शविली.

या वेळी सर्वांनी स्वामीजींची भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. कार्यकर्त्यांनी मराठा समाजच्या भूमिकेला पाठींबा देऊन मराठा समाज्याने सरकारकडे केलेल्या मागण्यांचे समर्थन करावे. असे स्वामीजी म्हणाले.

Related Stories

विकास करा; पण नागरिकांची दिशाभूल नको!

Amit Kulkarni

आंतरक्लब जलतरण स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni

बसवेश्वर पुतळा बसविण्याबाबत उद्या बैठक

Patil_p

बुलकमध्ये पुस्तक परिचय

Patil_p

दुसऱया टप्प्यातील सात तालुक्यात 83.16 टक्के मतदान

Patil_p

नगरपंचायतीचा पदभार वठार यांनी स्वीकारला

Amit Kulkarni