Tarun Bharat

मेग लॅनिंगचा क्रिकेटमधून ब्रेक

Advertisements

सिडनी / वृत्तसंस्था

विश्वचषक विजेती ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार मेग लॅनिंग हिने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनिश्चित कालावधीकरिता ब्रेक घेतला. स्वतःकडे अधिक लक्ष देता यावे, यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे तिने जाहीर केले. ऑस्ट्रेलियन संघ डिसेंबरच्या मध्यात 5 टी-20 सामन्यांसाठी भारत दौऱयावर येणार असून पाकिस्तानविरुद्ध मायदेशात मालिका खेळेल आणि पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत टी-20 वर्ल्डकपमध्ये भाग घेणार आहे. मागील काही कालावधीत भरगच्च क्रिकेट कार्यक्रमामुळे विश्रांती घेणेही महत्त्वाचे होते, असे लॅनिंग यावेळी म्हणाली. अलीकडेच बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत लॅनिंगने ऑस्ट्रेलियाला सुवर्ण जिंकून दिले आहे. 30 वर्षीय लॅनिंगने 2010 मध्ये पदार्पण केले. त्यानंतर 2014 मध्ये तिच्याकडे नेतृत्व सोपवले गेले.

Related Stories

बजरंग पुनियाचे लक्ष कांस्यपदकावर

Patil_p

स्पेनचा क्रेस्पो ओडिशा एफसीशी करारबद्ध

Patil_p

एबी डिव्हिलियर्सची IPL मधून निवृत्ती

datta jadhav

गर्ग, जयस्वाल, जुरेल यांची शानदार अर्धशतके

Patil_p

माँट्रियल टेनिस स्पर्धेत इटलीची जॉर्जी विजेती

Patil_p

झरीनचा वर्ल्ड चॅम्पियनला धक्का

Amit Kulkarni
error: Content is protected !!