Tarun Bharat

टेबल टेनिस फेडरेशनच्या अध्यक्षपदी मेघना अहलावत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या अध्यक्षपदी हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या पत्नी मेघना अहलावत यांची नियुक्ती करण्यात यांची करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारताचे अर्जुन पुरस्कार विजेते टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांची संघटनेच्या सचिवपदी निवड झाली आहे.

गेल्या फेब्रुवारीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशन त्यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल निलंबित केली होती. त्यानंतर या फेडरेशनच्या कारभाराची पाहणी करण्याकरिता राष्ट्रीय फेडरेशनने प्रशासकीय समितीची नियुक्ती केली दरम्यान अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनची नव्याने निवडणूक सोमवारी घेण्यात आली. तत्पुर्वी हरियाणा आणि गुजरात टेबल टेनिस संघटनांच्या वादावर सामोपचाराने पडदा रविवारी टाकण्यात आला. यापुर्वी अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनचे अध्यक्षपद हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला भूषवित होते. आता त्यांच्या जागी त्यांची पत्नी मेघना अहलावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत टेबल टेनिस फेडरेशनच्या पदाधिकाऱयांची निवड करण्यात न आल्याने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनने घटनेनुसार अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनवर निलंबनाची कार्यवाही केली होती. आता या फेडरेशनच्या खजिनदारपदी नागेंद्र रेड्डी पटेल यांची नियुक्ती करण्यात आली असून रिंकू आचार्य, चेतन गुरुंग, सी. गुनालेन, प. डोर्जी, मेगजी, प्रमोद कुमार चौधरी, पी. विश्वनाथ राव, राजू दुग्गल, रुपक देब्रॉय, पुर्वेश जरिवाला, अलका शर्मा यांची विविध पदासाठी निवड झाली आहे.

Related Stories

व्हिक्टर ऍक्सलसेन अंतिम फेरीत

Patil_p

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून प्रारंभ

Patil_p

आयसीसीच्या मासिक सर्वोत्तम पुरस्कारासाठी बुमराहची शिफारस

Patil_p

लंकेच्या हसरंगाला समज

Patil_p

पोडियमवरील निषेधामुळे रेव्हन अडचणीत

Patil_p

नीरज चोप्रा वर्षभरानंतर प्रथमच मैदानात उतरणार

Patil_p