Tarun Bharat

मेल जोन्स यांचा राजीनामा

Advertisements

वृत्तसंस्था/ मेलबर्न

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संचालिका मेल जोन्स यांनी आपल्या संचालकपद सोडणार असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने गुरुवारी दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठक ऑक्टोबरमध्ये होणार असून या बैठकीत मेल जोन्स आपले पद सोडणार आहेत.

मेल जोन्स यांनी आपल्या अन्य व्यवसायामध्ये अधिक लक्ष देण्याचे ठरविले आहे. त्या आता ऑस्ट्रेलिया आणि विदेशात आपल्या व्यवसायाचा व्याप वाढवित असून आपला बहुमोल वेळ प्रसारमाध्यमातील कार्यासाठी खर्च करणार आहेत त्यामुळे त्यांनी पुन्हा या पदासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिली. डिसेंबर 2019 साली मेल जोन्स यांची क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मेल जोन्स या ऑस्ट्रेलियाच्या माजी महिला क्रिकेटपटू असून त्यांनी 1997 साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत जोन्स यांनी 61 वनडे सामन्यात 1028 धावा जमविल्या आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्याला तीन वर्षांसाठी संचालकपद भूषविण्याची संधी दिल्याबद्दल जोन्स यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन हेंडरसन यांनी जोन्स यांच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रातील योगदानाबद्दल आभार मानले आहेत.

Related Stories

इंग्लंड-स्कॉटलंड सामना बरोबरीत

Patil_p

रोहितने ‘इंडिया क्रिकेटर’चे संबोधन का हटवले?

Omkar B

डिक्वेला, मेंडीस, गुणतिलका यांच्यावर बंदी, दंडात्मक कारवाई

Patil_p

शोएब अख्तरला व्हायचे आहे भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक!

Patil_p

माजी फुटबॉलपटू एसएस वासिम यांचे निधन

Patil_p

लंका-बांगलादेश पहिली कसोटी आजपासून

Patil_p
error: Content is protected !!