Tarun Bharat

सत्तरी अर्बनच्या भरभराटीसाठी सभासदांनी सहकार्य करावे

Advertisements

वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाचे आवाहन : सत्तरी अर्बन को. ऑप.चे मल्टीपर्पज पेडिट सोसायटी असे नामकरण

प्रतिनिधी /वाळपई

आर्थिक स्तरावर सत्तरी अर्बन को.ऑप. पेडिट सोसायटीने राज्यात पतसंस्थेच्या क्रमवारीत तिसरा क्रमांक पटकाविलेला आहे. या संस्थेच्या गोव्यामध्ये एकूण 14 शाखा आहेत. सर्व शाखा मधून चांगला व्यवहार सुरू असून संस्थेच्या भरभराटीसाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या संचालक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. 

  या संस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच वाळपई येथील लक्ष्मीबाई मेमोरियल सभागृहामध्ये झाली. यावेळी मोठय़ा प्रमाणात सभासदांची उपस्थिती होती. सभेच्या व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन ऍड. यशवंत गावस, संचालक प्रेमनाथ हजारे, वासुदेव परब, ऍड. काशिनाथ म्हाळशेकर, श्रीपाद सावंत, गोविंद कोरगावकर, नितीन शिवडेकर, सपना परब व अक्षता गावस यांची उपस्थिती होती.

इतर क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी नामांतर

बँकिंग क्षेत्राबरोबरच संस्थेने वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये कार्यरत रहावे अशी सूचना चार वर्षांपूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली होती. त्याची अंमलबजावणी करताना संस्थेच्या कायद्यामध्ये बदल केला आहे. सत्तरी अर्बन को. ऑप. पेडिट सोसायटी या नावामध्ये बदल करून त्यात सत्तरी अर्बन मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी असे नामकरण केले आहे. यामुळे बँकिंग क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रातही व्यवसाय करण्यावर भर देण्यात येणार आहे.

  सुरुवातीला संस्थेचे संचालक कृष्णा गावस यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण गावस यांनी केले. वेगवेगळय़ा विषयावर झालेल्या चर्चेमध्ये संस्थेचे सभासद सिताराम गावस उदय सावंत, राजेंद्र देसाई, धनंजय देसाई, भगवान हरमलकर, नामदेव गावष, सूर्यकांत देसाई, विष्णू पारोडकर ,गणपत गावकर ,देमू गावकर यांनी भाग घेतला. शेवटी गोविंद कोरगावकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Related Stories

जगदीश भोबे तृणमूलमध्ये दाखल

Amit Kulkarni

मोपावर विमानाचे पहिले ‘लँडिंग’ यशस्वी

Amit Kulkarni

द. गो. युवा काँग्रेसचे अध्यक्ष उबेद खान तृणमूल काँग्रेसमध्ये

Amit Kulkarni

पणजीला आता मुख्यमंत्रीच वाली

Patil_p

संत समाज कायसुव अध्यक्षपदी आनंद हरमलकर

Amit Kulkarni

डिचोली तालुक्यात एकूण 488 उमेदवारी अर्ज दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!