अखिलेश यांच्या हस्ते भूमिपूजन
वृत्तसंस्था/ सैफई
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांची बुधवारी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त सप अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुलायम सिंह यादवांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले आहे. रामगोपाल यादव आणि डिंपल यादव यांच्यासमवेत कुटुंबातील अनेक सदस्यांनी मुलायम सिंह यादव यांच्या समाधीस्थळी जात श्रद्धांजली वाहिली आहे. या ठिकाणी सपचे हजारो कार्यकर्ते दाखल झाले होते.
मुलायम सिंह यादवांचे स्मारक 8.3 हेक्टर भूखंडावर निर्माण केले जाणार आहे. तर 4.5 एकर जमिनीत सुविधायुक्त पार्क तयार करण्यात येणार आहे. या स्मारकाच्या निर्मितीसाठी 80 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या स्मारकाद्वारे मुलायम सिंह यादव यांचे जीवन मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्मारकाच्या ठिकाणी लोकांसाठी अनेक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.