मुंबई
लक्झरी कार्सच्या क्षेत्रात नावाजलेल्या मर्सिडीझ-बेंझला यावषी कार विक्रीत 30 टक्के वाढीची आशा वाटते आहे. यावषी आतापर्यंत 7 हजार कार्सची विक्री नोंदली गेली असून ही आजवरची सर्वोच्च असल्याचे कंपनीचे सीईओ व एमडी मार्टिन श्वेंक यांनी सांगितले. वाहनांची वाढती मागणी पाहता यावषी कार विक्रीत 30 टक्के वाढ होऊ शकते. ग्राहकांकडून कार खरेदीची मोहीम सुरू असून कारकरीता ऑर्डर्सही येत आहेत. त्यामुळे कंपनी या मागणीमुळे समाधानी आहे, असेही ते म्हणाले.