Tarun Bharat

बास्केटबॉलपटूसाठी ‘मर्चंट ऑफ डेथ’ची सुटका

अबुधाबी विमानतळावर अमेरिका अन् रशियाने बदलले कैदी

वृत्तसंस्था/ अबुधाबी

रशिया आणि अमेरिकेने स्वतःच्या तुरुंगांमध्ये कैद परस्परांच्या नागरिकांची मुक्तता केली आहे. एकीकडे अमेरिकेने शस्त्रास्त्रांचा डीलर व्हिक्टर बाउटला स्वतःच्या कैदेतून सोडले. तर दुसरीकडे रशियानेही अमेरिकेची बास्केटबॉल स्टार आणि ऑलिम्पिक पदकविजेती ब्रिटनी ग्रिनरची मुक्तता केली आहे.

खासगी विमानाद्वारे दोन्ही कैद्यांना संयुक्त अरब अमिरातमध्ये अबुधाबी विमानतळावर आणले गेले होते. रशियाच्या प्रसारमाध्यमाने दोन्ही कैद्यांच्या अदलाबदलीचा एक व्हिडिओ फुटेज जारी केला आहे. दोन्ही कैदी विमानातून उतरले आणि स्वतःच्या देशाच्या अधिकाऱयांसोबत मायदेशी परतल्याचे यात दिसून आले आहे.

ग्रिनरला रशियाने फेब्रुवारीत कॅनाबीस ऑइल या प्रतिबंधित अमली पदार्थासह मॉस्को विमानतळावर पकडले होते. जुलै महिन्यात बायडेन प्रशासनाने ब्रिटनीच्या मुक्ततेसाठी व्हिक्टर बाउटच्या सुटकेचा प्रस्ताव दिला होता. बाउटची सुटका करविण्यासाठी रशियाही प्रयत्नशील होता. ब्रिटनी ग्रिनर सुरक्षित असून तिची प्रकृती सुधारण्यास काही काळ लागणार असल्याचे उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी काढले आहेत.

‘मर्चंट ऑफ डेथ’ रशियात पोहोचला

व्हिक्टर बाउट 12 वर्षांपासून अमेरिकेच्या तुरुंगात कैद होता. त्याला जगभरात अवैधमार्गाने शस्त्रास्त्रs पोहोचविण्याप्रकरणी मर्चंट ऑफ डेथ म्हणजेच मृत्यूचा व्यापारी म्हटले जाते. रशियात पोहोचल्यावर बाउटचे त्याची पत्नी आणि आईने स्वागत केले आहे.

सलमान यांची मध्यस्थी?

सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी दोन्ही देशांकडून झालेल्या मुक्ततेत मध्यस्थी केल्याचे युएई आणि सौदी अरेबियाने एका वक्तव्याद्वारे जाहीर केले आहे. परंतु अमेरिकेने कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला आहे.  केवळ रशिया आणि अमेरिका यांच्यात करार झाला होता असे सांगण्यात आले. युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे पुतीन यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. सप्टेंबर महियात रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या कैद्यांच्या अदलाबदलीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती असे मानले जाते.

माजी सैनिकांच्या मुक्ततेची इच्छा

व्हिक्टर बाउटच्या मुक्ततेसाठी अमेरिकेला केवळ ब्रिटनी ग्रिनर नव्हे तर एका माजी सैनिकाची सुटका करवून घ्यायची होती. नौदलाचे माजी अधिकारी पॉल व्हीलन यांचीही मुक्तता करण्यात यावी अशी मागणी अमेरिकेने केली होती. पॉल व्हीलन हे 2018 पासून रशियाच्या तुरुंगात कैद आहेत. त्यांच्यावर रशियाने हेरगिरीचा आरोप ठेवला होता.

Related Stories

ट्रकचालक विरोधात कॅनडा सरकार कठोर

Patil_p

हातपाय नसलेली युवती करतेय मॉडेलिंग

Patil_p

न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार

datta jadhav

कोटय़धीश असूनही भिक्षाधीश

Patil_p

स्पेनमध्ये हिंसाचार

Patil_p

हॉलिवूडमधील ‘जेम्स बाँड’ काळाच्या पडद्याआड

Patil_p