Tarun Bharat

पाकिस्तानात पारा 51 अंशांच्या पार

जगातील सर्वात उष्ण भाग ठरला जैकबाबाद

वृत्तसंस्था/इस्लामाबाद

Advertisements

वाढत्या उष्णतेदरम्यान लोक आता दिवसा घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. भारतात वाढत्या उष्णतेमुळे लोक त्रस्त आहेत. तर पाकिस्तानाने उष्णतेने सर्व विक्रमच मोडीत काढले आहेत. पाकिस्तानच्या जैकबाबादमध्ये पारा शनिवारी 51 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. 2022 हे वर्ष जगभरात सर्वात उष्ण ठरले आहे. ऑस्ट्रेलियात 50.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

उष्णतेपासून सध्या कुठलाच दिलासा मिळणार नसल्याचा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे. आगामी दिवसांमध्ये तापमान 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहणार आहे. विनाकारण घराबाहेर न पडण्याचा इशारा अधिकाऱयांनी लोकांना दिला आहे. उष्माघातामुळे शरीरातील पाण्याचा अंश वेगाने कमी होण्याची भीती आहे.

पाकिस्तानच्या जैकबाबादमध्ये मे महिन्यात सरासरी तापमान 4.38 अंश सेल्अिसस असते. कराची शहरात शनिवारचा दिवस मागील दशकातील सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. कराचीचे तापमान 42.8 अंशांवर पोहोचले आहे.  वाढत्या उष्णतेदरम्यान सिंधू नदीतील पाण्याचा प्रवाह 65 टक्क्यांनी कमी झाला आहे. पंजाबच्या चोलिस्तानमध्ये उष्णतेमुळे मेंढय़ांचा मृत्यू ओढवतोय. हा भाग पाकिस्तानला सर्वाधिक प्रमाणात गहू उपलब्ध करतो. परंतु यंदाच्या उष्णतेमुळे गहू उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे.

Related Stories

काबुल विमानतळावर पुन्हा गोळीबार

datta jadhav

कुस्तीपटू अफकारीला इराणने ठोठावली फाशी

Patil_p

म्यानमारमध्ये संघर्षात 114 आंदोलक ठार

Patil_p

व्होडका प्या, हॉकी खेळा, कोरोनातून बरे व्हाल!

Patil_p

सर गंगाराम यांचे समाधीस्थळ 10 वर्षांनंतर सर्वसामान्यांसाठी खुले

Patil_p

जपानच्या तळावरून युएईची ‘मंगळ’झेप

Patil_p
error: Content is protected !!