प्रतिनिधी /वास्को
एमईएस स्टाफ को-ऑपरेटीव्ह सोसायटीची 36 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत सोसायटीच्या सभासदांच्या मुलांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार दाजी साळकर, सन्माननीय अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर तसेच सोसायटीचे माजी संचालक महेश वारले व आनंद नार्वेकर, सोसायटीचे अध्यक्ष बाबू उपार्डेकर, उपाध्यक्ष विठ्ठल मालवणकर, सचिव चंद्रकांत गांवकर, संचालक पोपट भिवशेट, स्नेहा आर्लेकर, अमर ताले, सुभया दासारी, पुजा ताम्हणकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते श्रृष्ठी लांडे, श्रद्धा चौधरी, पियुष गोवेकर, सानवी भोसले, आनंद गुप्ता, लोकांक्षा गांवकर, रोशिनी कुमारी, शुभ हळर्णकर, सुहानी सावंत, साईश उपार्डेकर, अपराजीता रेडकर, निशीता शिरोडकर व सिया बाबू उपार्डेकर यांचा गौरव करण्यात आला. सोसायटीचे माजी संचालक महेश वारले व आनंद नार्वेकर यांचा पाहुण्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.