बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांची आज शाहूनगर परिसरात प्रचार पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
सोमवार दि. १ मे रोजी उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीलाच मत घालण्याची विनंती केली. त्यांच्या या प्रचार पदयात्राला जनतेतून चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रचारानिमित्त गल्लोगल्ली उमेदवार अमर येळ्ळूरकर यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बऱ्याच ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले.
या पदयात्रेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शविली आणि समितीला निवडून आणण्यासाठी जयघोष केला.