बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असून आज खासबाग परिसरात क्रेनच्या साहाय्याने त्यांचे भव्य पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आला.
आज दि. २६ रोजी सकाळी छत्रपती शिवाजी उद्यान येथून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर होसूर मठ गल्ली, बसवाण गल्ली, ओमकार नगर, शृंगेरी कॉलनी, टीचर्स कॉलनी, जोशी मळा, संभाजी रोड, खासबाग या परिसरात प्रचारफेरी संपन्न झाली.
उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. यंदाच्या निवडणुकीत आपले बहुमोल मत देऊन आपणास बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. प्रचारादरम्यान ठिकठिकाणी उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात येत होते.
याप्रसंगी मोठ्यासंख्येने महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.