Tarun Bharat

बॅलोन ओडोर शर्यतीतून मेस्सी बाहेर

Advertisements

वृत्तसंस्था / नेयान

अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लायोनेल मेस्सीला बॅलोन ओडोर पुरस्काराच्या 30 फुटबॉलपटूंच्या शिफारस यादीतून 2005 नंतर पहिल्यांदाच वगळण्यात आले.

अर्जेंटिनाच्या मेस्सीने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकिर्दीमध्ये सात वेळा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविला. मागील वर्षी 35 वषीय मेस्सीने सदर पुरस्कार मिळविताना प्रतिस्पर्धी पोलंडचा हुकमी स्ट्रायकर रॉबर्ट लेवेन्डोस्कीला मागे टाकले होते. 2019 साली मेस्सीने बलून डी ओर पुरस्कार पटकाविला होता. दरम्यान कोरोना महामारी समस्येमुळे 2020 साली हा पुरस्कार रद्द करण्यात आला होता. यंदा मेस्सीसह नेमारला देखील शिफारशीतून वगळले गेले आहे.

शिफारस फुटबॉलपटूंच्या यादीमध्ये लॅवेन्डोस्की, कायलेन एम्बापे, करीम बेंझेमा, हॅलेंड तसेच पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, मोहम्मद सलाह, सॅडीवो माने, केव्हीन डी ब्रून, हॅरी केन, सन हेयूंग मिन यांचा समावेश आहे. या यादीमध्ये मँचेस्टर सिटी क्लबच्या तसेच लिव्हरपूल क्लबच्या प्रत्येकी 6 फुटबॉलपटूंचा समावेश आहे. फ्रान्सच्या फुटबॉल मासिकातर्फे 1956 पासून प्रत्येकी वषी हा पुरस्कार दिला जातो. 2018 पासून महिलांसाठी या पुरस्काराला प्रारंभ करण्यात आला. यंदाचा पुरस्कार वितरण समारंभ 17 ऑक्टोबरला आयोजित केला आहे.

Related Stories

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा बंदिस्त स्टेडियममध्ये होणार

Patil_p

डेल स्टीन कँडी टस्कर्समध्ये दाखल

Omkar B

ब्रिटनला हरवून ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

Patil_p

जर्मनीच्या व्हेरेव्हचे आव्हान समाप्त

Patil_p

Tokyo Olympics 2020: बॉक्सर पूजा राणीची उपांत्यपूर्व फेरीत धडक, दीपिका कुमारीही विजयी

Abhijeet Shinde

ही लढाई घरात बसूनच जिंकावी लागेल

tarunbharat
error: Content is protected !!