सोशल मीडिया नेहमीच रंजक माहीतीने भरलेला असतो. होऊ घातलेल्या अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स FIFA विश्वचषक फायनलमुळे फुटबॉलचा उन्माद शिखरावर आहे त्यातच सध्या लेटेस्ट ट्रेंडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पासबुकचा फोटो आहे. सध्या एसबीआय बँकेचे पासबुक इंटरनेवर खुपच फिरत असून सर्व नेटिझन्सनी याला उचलून धरले आहे. ट्विटरवर नेहमीच विविध गोष्टी ट्रेंड करत असतात. सध्या सर्वात जास्त ट्रेंडमध्ये SBI बँकेचे पासबुक असून नेटिझन्सच्या या अविष्कारची चर्चा सर्व सोशल मिडीयावर आहे. काय आहे हा ट्रेंड आणि का शेअर केला जात आहे आपापल्या बँक पासबूकचे फोटो…?
लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ, FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचला आणि मेस्सीच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कोणत्याही प्रकारे आपण मेस्सी आणि त्याच्या अर्जेंटिनाचे फॅन कसे आहोत हे दाखवले जात आहे. त्यातच मेस्सीच्या एका फॅनने शक्कल लढवली आणि त्याचा ट्रेंड सुरू झाला. त्याने आपल्या एसबीआय बँकेच्या पासबूकचा फोटो ट्विटर हँडलवर टाकून आपण मेस्सी प्रेमी असल्याचे दाखवले. त्याचे हे फोटो इतर लोकांनी उचलून धरून आपल्याही पासबूकचे फोटो ट्विटरवर टाकले.


अर्जेंटिनाने क्रोएशियावर मिळवलेल्या आश्चर्यकारक विजयानंतर अर्जेंटिना देशाच्या ध्वजाचा रंग असलेला SBI चे पासबुक फोटो ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला. अर्जेंटिना संघाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी SBI पासबुकचा फोटो रिट्विट केला जात असून लिओनेल मेस्सीचे भारतात लाखो फॉलोअर्स असल्याचे दिसून येत आहे.


मेस्सी आणि अर्जेंटिना भारतातील चाहत्यांसाठी पर्वणी ठरत असून रविवारी होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेस्सीचे भरतीय चाहते टिव्हीसमोर जल्लोष करताना दिसतील. लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना फिफा विश्वचषक फायनलमध्ये पोहोचताच, एसबीआय पासबुक ट्रेंडिंग सुरू झाले. SBI पासबुकचा रंग अर्जेंटिनाच्या जर्सीसारखाच आहे.


सोशल मीडिया नेहमीच रंजक माहीतीने भरलेला असतो. होऊ घातलेल्या अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स FIFA विश्वचषक फायनलमुळे फुटबॉलचा उन्माद शिखरावर आहे त्यातच सध्या लेटेस्ट ट्रेंडमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पासबुकचा फोटो आहे.


त्याचा रंग अर्जेंटिनाच्या जर्सीसारखाच आहे. लिओनेल मेस्सीच्या संघाने क्रोएशियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश करताच हा फोटो ट्रेंड होऊ लागला. मेस्सीचे भारतात लाखो चाहते आहेत आणि विनम्र SBI पासबुकला सोशल मीडियावर त्यांच्याकडून सर्वांचे प्रेम मिळत आहे. अर्जेंटिनाला तिसर्यांदा ट्रॉफी जिंकण्याच्या संधीसाठी फ्रान्सशी लढताना पाहण्याच्या आनंदात वापरकर्त्यांनी SBI च्या पासबुकच्या विविध प्रतिमा शेअर केल्या आहेत.