3 पोलीस जखमी ः मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रs हस्तगत
वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
मेक्सिकोच्या टेक्सकाल्टिट्लान शहरात पोलीस आणि बंदूकधारी गुंडांदरम्यान चकमक झाली आहे. या चकमकीत 10 गुन्हेगार मारले गेले असून 4 जण जखमी झाले आहेत. तर 3 पोलीस जखमी झाल्याचे समजते. पोलिसांनी या घटनेत सामील 7 जणांना अटक केली आहे. मेक्सिको सिटीपासून 130 किलोमीटर अंतरावरील टेक्सकाल्टिट्लान शहरात ही चकमक झाली आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी 20 रायफल्स, पिस्तूल, हँडगन, काडतूसं, 5 वाहने, सैन्य गणवेश आणि बुलेटप्रूफ जॅकेट जप्त केले आहे. मेक्सिकोच्या या शहरात अमली पदार्थ तस्कर आणि गुन्हेगारी टोळय़ांची दहशत आहे.
काही दिवसांपूर्वी मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये सुरक्षित रस्त्यांयच मागणीवरून लोकांनी निदर्शने केली होती. अध्यक्ष मॅन्युअल लोपेझ यांनी हिंसा आणि गुन्हय़ांवर आळा घातला जाणार असल्याचे आश्वासन जनतेला दिले होते. अशा स्थितीत सुरक्षा दलांवर झालेल्या गोळीबाराने सरकारची चिंता वाढली आहे.
मेक्सिकोमध्ये 2007 पासून हिंसा आणि टोळीयुद्ध यासारख्या गुन्हय़ांमध्ये वाढ झाली आहे. 2007 मध्ये अमली पदार्थ माफियांविरोधात लढण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष फेलिप काल्डेरन यांनी सैन्याची मदत घेतली होती. तेव्हापासून देशात हिंसेचे प्रमाण वाढले आहे.