Tarun Bharat

पुण्यात म्हाडाच्या 5 हजार घरांची सोडत, उद्यापासून ऑनलाईन नोंदणी

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

पुणे शहर व परिसरात म्हाडाच्या 5 हजार 68 सदनिकांची सोडत निघणार आहे. त्यासाठी उद्यापासून (दि.9) ऑनलाईन नोंदणी सुरू होणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी दिली.

माने म्हणाले, 5 हजार 68 सदनिकांमध्ये म्हाडाच्या विविध गृहनिर्माण योजनांतील शिल्लक राहिलेल्या 278, बांधकाम व्यावसायिकांकडून 20 टक्के कोटय़ातून उपलब्ध झालेल्या 2 हजार 845 आणि म्हाडाच्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 1 हजार 945 सदनिकांचाही समावेश आहे. या घरांच्या सोडतीसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ उद्या (ता.9) दुपारी 2 वाजता मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला जाणार आहे. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

म्हाडाने घर खरेदी करणाऱ्यांच्या उत्पन्न मर्यादेतही बदल केला आहे. उत्पन्न मर्यादेतील बदल मुंबई महानगर क्षेत्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असेल.अत्यल्प उत्पन्न गटासाठी ही मर्यादा आता वार्षिक 6 लाख रुपये असणार आहे तर अल्प उत्पन्न गटासाठी 6 ते 9 लाख रुपये, मध्यम गटासाठी 9 ते 12 लाख आणि उच्च गटासाठी 12 ते 18 रुपये प्रतिवर्ष असणार आहे.

उत्पन्नानुसार सोडतीमध्ये घरांचे मंजूर झालेले क्षेत्रही बदलण्यात आले आहे. नवीन बदलेल्या क्षेत्रानुसार अतिशय लहान गटातील घरांसाठी 30 चौरस मीटर क्षेत्रफळ, लहान गटाच्या घरांसाठी 60 चौरस मीटर, मध्यम गटाच्या घरांसाठी 160 चौरस मीटर आणि उच्च गटासाठी 200 चौरस मीटर क्षेत्रफळ देण्यात येणार आहे.

Related Stories

संरक्षण सामर्थ्यात भारत चौथ्या स्थानी

Patil_p

पंजाबमध्ये कोरोना बाधितांची संख्या 15 हजार पार

Tousif Mujawar

हुतात्म्यांच्या कुटुंबियांना दरमहा २० हजार रुपये भत्ता

Rohit Salunke

देवेंद्रजी मविआचा मोर्चा पॉवरफुल, ड्रोन शॉट काढून एकदा पाहाच

Archana Banage

दिल्लीतील मशिदीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मौलाना अटकेत

Archana Banage

चीनहून आयात केलेल्या रॅपिड टेस्टिंग किटमध्ये तब्बल 145 टक्के नफेखोरी

prashant_c