Tarun Bharat

म्हापसा पोलिसांकडून लाखाचे कोकेन जप्त

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

म्हापसा पोलिसांनी रविवारी पहाटे येथील नव्या बस स्थानकावर छापा घालून झहीरशेख (43) रा. बेळगाव वीरभद्रनगर फस्ट क्रॉस या इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 11 ग्रॅम कोकेन जप्त केले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत 1 लाख रुपये होते. पहाटे 3 वाजेपर्यंत हि कारवाई सुरू होती.

पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशीरा पोलिसांना येथे अंमली पदार्थ घेऊन येणार याची माहिती मिळाल्यावर रात्रौ उशीरापर्यंत येथे पाळत ठेवून अखेर झहीर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे 11 ग्रॅम कोकेन आढळून आले. तो हा अंमलीपदार्थ कुणाला घेऊन आला होता याची चौकशी पोलीस करीत आहे.

निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक बाबली परब, उपनिरीक्षक गौरव नाईक, उपनिरीक्षक वीराज कोरगांवकर, हवालदार सुशांत चोपडेकर, शीपाई राजेंश कांदोळकर, प्रकाश पोवळेकर, आनंद राठोड, प्रसाद गांवकर यांनी ही कारवाई केली. उपअधिक्षक जिवबादळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली.

Related Stories

फातोर्डा व मडगाव भाजपतर्फे निषेध

Patil_p

नावेली शनैश्वर मंदिरात शनी अमावास्या उत्सव

Amit Kulkarni

गणेश चलतचित्र देखावा स्पर्धेत मंदार शेटगावकर प्रथम

Amit Kulkarni

मडगावात आज शिमगोत्सव मिरवणूक

Patil_p

कंत्राटी कामगारांची सरकारी सेवेत पूर्ण वेळ घेण्याची मंत्री मायकल लोबोकडे मागणी

Patil_p

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्चपासून

Amit Kulkarni
error: Content is protected !!