Tarun Bharat

गंभीर आजाराने पुतीन यांचा मृत्यू; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा काही दिवसांपूर्वीच गंभीर आजाराने मृत्यू झाल्याचा धक्कादायक दावा ब्रिटनच्या MI-6 या गुप्तचर यंत्रणेने केला आहे. रशिया-युक्रेन युद्धावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून पुतीन यांच्या मृत्यूची बातमी लपवून ठेवली असावी. आता पुतीन यांच्यासारखी हुबेहुब दिसणारी व्यक्ती देशाचा कारभार चालवत असल्याचेही या गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

मागील तीन महिन्यांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान पुतीन यांना ब्लड कॅन्सर असल्याचे सांगितलं जात होतं. त्यावरील उपचारासाठी ऐन युद्धाच्या काळात पुतीन सुट्टीवर जाणार होते. पुतीन यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. त्यांच्या अनुपस्थितीत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे प्रमुख आणि एफएसबी या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख निको सांभाळणार असल्याचेही सांगण्यात येत होते.

आता रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच अचानक पुतीन यांच्या निधनाचा दावा ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने केला आहे. युद्धावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून रशियाने पुतीन यांच्या मृत्यूची बातमी लपवून त्यांच्या जागी हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तीला बसवले असावे, असे या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी म्हटले आहे. दरम्यान, पुतीन यांनी युक्रेनच्या युद्धासंदर्भात अमेरिका आणि जर्मनी या देशांना थेट इशारा दिला होता. तसेच प्रसिद्धी माध्यमांनी त्यांचे जे व्हिडीओ दाखवले ते पूर्वीच रेकॉर्ड करून ठेवले गेले असावेत, अशीही शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला रशियाच्या ‘व्हिक्टरी परेड’मध्ये पुतीन सहभागी झाल्याचे वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये दाखवले होते. पण या परेडमध्येही ते स्वतः नव्हते, तर त्यांच्यासारखा दिसणारा व्यक्ती असावा, अशी शक्यताही ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे.

Related Stories

अजबच!, सहारा वाळवंटच गोठले

Patil_p

कोहिनूरयुक्त मुकूटाला नव्या राणीचा नकार

Patil_p

स्पुतनिक 5 पासून एड्स होण्याचा धोका?

Patil_p

‘आरआरआर’ला गोल्डन ग्लोब पुरस्कार

Patil_p

मंगळावर सापडले पाण्याचे स्पष्ट पुरावे

Patil_p

वॅक्स ठरला ऑक्सफोर्डचा वर्ड ऑफ द ईयर

Patil_p