Tarun Bharat

मराठा मंडळ अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांना मायक्रोसॉफ्टचे प्रमाणपत्र

बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना मायक्रोसॉफ्टने “मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेटर” म्हणून प्रमाणित केले आहे. मायक्रोसॉफ्ट हे सॉफ्टवेअर आणि एज्युटेक क्षेत्रात जगात आघाडीवर आहे.

शिक्षकांनी 22 दिवसांचे कठोर प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर चाचण्या, असाइनमेंट आणि प्रॅक्टिकल केले. एकूण 20 फॅकल्टी सदस्य या प्रशिक्षणात यशस्वी झाले आणि मायक्रोसॉफ्टचे प्रतिष्ठित प्रमाणपत्र मिळवले. 21 व्या शतकातील विविध नाविन्यपूर्ण डिजिटल आणि शैक्षणिक पद्धतींचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. कॅम्पसच्या एकूण डिजिटल परिवर्तनाच्या दृष्टीने, प्राध्यापक आता मिश्रित आणि संकरित शिक्षणाच्या धोरणांसह सुसज्ज झाले आहेत.

प्राचार्य डॉ.डी.जी.कुकर्णी यांनी अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा अंगीकार करणे प्राध्यापकांनी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. संस्थेने सर्व प्राध्यापकांना लॅपटॉप आणि डिजिटल उपकरणे दिली आहेत. प्रमाणपत्रही शिक्षकांसाठी एक विश्वासार्ह पोहोचपावती असल्याचे ते म्हणाले.

डॉ. राजश्री नागराजू म्हणाल्या की, व्यवस्थापन एनईपी 2020 च्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करत आहे आणि म्हणूनच सर्व वर्गखोल्या आता डिजिटल केल्या आहेत. विद्यार्थ्यांना लॅपटॉप देखील प्रदान केले आहेत जेणेकरून ते घरबसल्या प्रॅक्टिकल आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा सराव करू शकतील. कॅम्पस 24×7 लर्निंग कॅम्पस असल्याचे त्या म्हणाल्या.

हायब्रीड लर्निंगचे प्रमुख प्रा. अनुज देशपांडे यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले.

Related Stories

बेंगळूर: सिद्धरामय्या यांची प्रकृती स्थिर

Archana Banage

खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस

Patil_p

नैराश्यावर करा मात, नशीब देईल साथ!

Amit Kulkarni

यंदा 10 हजार टन मत्स्य उत्पादनाचे उद्दिष्ट

Amit Kulkarni

जायंट्स सखीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

Amit Kulkarni

कपिलतीर्थ मंडळाच्या युवकांची गडकोट मोहीम

Patil_p