Tarun Bharat

गद्दारांचं सरकार कोसळणार, राज्यात पुन्हा निवडणूक लागणार; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दोन दिवसापूर्वी घेतलेल्या राज्य संपर्क प्रमुखांच्या बैठकीत मध्यावधी निवडणूक होणार असल्याचे म्हणत कारकर्त्यांना कमला लागण्याचे आदेश दिले होते. आता युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही हे सरकार लवकरच पडणार असून पुन्हा निवडणूक लागणार आहेत, असेआदित्य ठाकरे म्हणाले. ते अकोल्यातील बाळापूरमध्ये बोलत होते. (mid term elections in maharashtra soon says aditya thackeray)

दरम्यान, काही महिन्यात हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच, पुन्हा एकदा निवडणुका लगाणार, तुम्ही तयार आहात का? असा सवाल युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना विचारला. आज ते आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांच्या मतदारसंघात बाळापूर येथे बोलत होते. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले होते. येत्या काळात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी तयार राहावं असे आवाहन केलं होतं. आज पुन्हा आदित्य ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकांचे सुतोवाच केले आहे.

मला शेतीतलं काही कळत नाही, पण मला तुमच्या डोळ्यांतील अश्रू दिसतात. तुमच्या भागात अतिवृष्टी झाली. पण नुकसान भरपाई मिळाली नाही, विम्याचे पैसे तुमच्या वाट्याचेच भरले. पीकविमा मिळाला नाही. पंचनामा झाला नाही. प्राथमिक सर्व्हेही झाला नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

माझा उद्धव माझा विश्वास एवढा विश्वास उद्धव ठाकरेंवर आहे. पण आज महाराष्ट्रात हाल चालले आहेत. राज्यातील मंत्री कोण हे माहित नाहीत. मुख्यमंत्री गद्दार, उद्योगमंत्री गद्दार, कृषीमंत्री गद्दार, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मला छोटा पप्पू बोला. मला अजून नावं ठेवा. पण जनतेची सेवा करा. हा छोटा पप्पू तुम्हाला महाराष्ट्रातून पळवून लावणार की नाही बघा, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.

पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार असताना शेतकऱ्यांना २.५० लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली. सुभाष देसाई यांनी कोरोना काळात ६.५० लाख कोटींची गुंतवणूक आणली. मात्र, हे घटनाबाह्य सरकार आहे. गद्दारांच सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, पुन्हा एकदा महाराष्ट्रात निवडणूका लागणार,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.

Related Stories

ट्रम्प यांना विषाचे पाकीट पाठवणाऱ्या महिलेस अटक

datta jadhav

निवडणूकीपूर्वी शिवसेनेची मते फुटण्याची शक्यता? रामदास आठवले

Archana Banage

डिलीव्हरीबॉयनी चोरले पावणेदोन लाखांचे मोबाईल

Patil_p

सोसताही येईना, सांगताही येईना

Patil_p

प्रताप सरनाईकांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर ईडीचा छापा

Archana Banage

दूधगंगेतुन इचलकरंजीला पाणी देवू देणार नाही

Archana Banage