बदलतेय वयाची व्याख्या, मध्यमवयाच्या लोकांकडून नवे कौशल्य आत्मसात
मध्यमवयात स्थैर्य आणि आरामाची इच्छा बाळगणारी मानसिकता बदलत आहे. वयाच्या 40 वर्षांनंतरही लोक नवे कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञान शिकत आहेत. तसेच करियर बदलत आहेत. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यावर लक्ष देत आहेत. ज्या वयात स्वतःच्या आयुष्यात पूर्णपणे स्थिरसावर होण्याचे बोलले जाते, त्या वयात लोक नवी सुरुवात करत आहेत. तसेच यात यशस्वी देखील होत आहेत. युरोप आणि अमेरिकेत हा ट्रेंड वाढत आहे.
हेली बेरी, ह्यू जॅकमॅन, नाओमी कॅम्पबेल, जेनिफर लोपेझ, एलिझाबेथ हर्ले, टॉम क्रूज यासारख्या वयाच्या मध्यम टप्प्यात पोहोचलेले कलाकार आता आदर्श ठरले आहेत. अनेकांनी तर मध्यमवयातच स्वतःची अभिनयाची कारकिर्द सुरू केली होती. रिचर्ड विल्सनने वयाच्या 53 व्या वर्षी चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते.
ब्रिटनमध्ये तर मध्यमवयाची व्याख्याच बदलत अताहे. आतापर्यंत 40 वर्षानंतर मध्यमवयाची सुरुवात होत असल्याचे मानले जात राहिले आहे. तर आता 40-60 वर्षांदरम्यान मध्यमवय म्हटले जात आहे. 2018मध्ये झालेल्या युगोव्ह सर्वेक्षणानुसार 40-64 वर्षांचे ब्रिटिश स्वतःला मिडल एज मानतात. 65-69 र्वीय 44 टक्के ब्रिटिश स्वतःला वृद्ध मानत नाहीत तर मिडल एज मानतात.
ज्याप्रकारे युरोप आणि अमेरिकेत या वयाच लोक सक्रीय आहेत, ते पाहता त्यांनी मिडल एज समजण्याचे पारंपरिक वयच पुढे ढकलले आहे. ब्रिटनमध्ये इंटनरॅशनल लॉन्गीविटी सेंटरमध्ये ग्लोबल रिसर्चचे प्रमुख प्राध्यापक लेस मेह्यू यांनी लोकांचे सरासरी आयुर्मान वाढल्याचे म्हटले आहे.
नवकौशल्य असेल तरच नोकरी
सध्या ज्याप्रकारच्या नोकऱया उपलब्ध आहेत, 2030 पर्यंत त्यातील 85 टक्के नोकऱया संपुष्टात येणार आहेत. याचमुळे लोकांना स्वतःचे कौशल्य वाढवावे लागणार आहे. मिडल एजच्या लोकांना स्वतःच्या पसंतीचा नवा पेशा निवडावा लागणार असल्याचे इन्स्टीटय़ूट फ्रॉम द फ्यूचरच्या अहवालात म्हटले गेले आहे.