सावंतवाडी/ वार्ताहर –
सावंतवाडी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला असून मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रथम निखिल नित्यानंद मसुरकर 97 40 तर दुतीय अथर्व राकेश कारेकर 96 80 तृतीय गणराज नरसु रेडकर 96 60. वैष्णव संतोष सावंत 96 टक्के पाचवा प्रतीक महेश झारापकर 95 80 आयडो निया डॅनी परेरा 95 80 गुण मिळवून यश मिळवले आहे पहिल्या पाच मधे इंग्रजी माध्यम चे विद्यार्थ्यांनी 95 पेक्षा जास्त गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे एकूण 211 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यात 163 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. तसेच 90 टक्के पेक्षा जास्त गुण 43 विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष बिशप ऑल्विन बरॅटो, प्रशालेचे मॅनेजर रे. फादर मिलेट डिसोजा , सेक्रेटरी रे .फादर मनवेल डिसिल्व्हा ,अन्य संस्थाचालक, प्रशालेचे मुख्याध्यापक रे. फादर रिचर्ड सालदाना, उपमुख्याध्यापिका रे. सिस्टर मेबल करवालो, पर्यवेक्षिका मेघना राऊळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.